Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्तीला अखेर अटक

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला ड्रग्ज वादामुळे वेगळं वळण मिळालं आणि या प्रकरणी आता रिया चक्रवर्तीच्या भाऊ शोविकला नार्कोटिक्स विभागाने (एनसीबी) अटक केली आहे. शोविक चक्रवर्तीला अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा कलम 20 ( ब ), कलम 28, कलम 29 आणि कलम 27 ( अ ) या कलमांतर्गत अटक करण्यात आली. शोविकसोबतच सुशांत सिंग राजपूतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा याला देखील याच कलमाखाली अटक करण्यात आली.

उद्या सकाळी शौविक चक्रवर्तीला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा २७ (अ) हे अजामीनपात्र कलम लावण्यात आल्याने शोविकला उद्या किंवा एनसीबीची कोठडी संपल्यावर लवकरात लवकर जामीन मिळणार नाही. पुढचे काही दिवस शोविकला एनसीबी कोठडीत किंवा जेलमध्येच काढावे लागणार हे नक्की.

बसित, जैद, शोविक आणि सॅम्युल मिरांडा यांची समोरा समोर बसून चौकशी केली असता शोविकच्या सांगण्यावरून बसितने जैदकडून अंमली पदार्थ आणले, तर जैदकडून शोविकने अंमली पदार्थ घेतले, असं समोर आलं आहे. ‘शोविक अंमली पदार्थ घेऊन सॅम्युलकडे गेला आणि शोविकच्या सांगण्यावरून अंमली पदार्थांचे पैसे दिले’, असं सॅम्युएल मिरांडाने कबूल केलं आहे. हे अंमली पदार्थ सॅम्युलने सुशांत सिंग राजपूतला दिले अशी कबूलीही या सर्वांनी दिली आहे. रियाचा भाऊ शोविक आणि रियाचा खास माणूस सॅम्युल मिरांडा यांच्या अटकेमुळे आता रियाच्या अटकेची ही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading