Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRA

शिवसेनेच्या महिला आघाडीकडून कंगना रनौतच्या प्रतिमेचे दहन

परभणी, दि. 5 – चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संतप्त महिला कार्यकर्तींनी शनिवारी वसमत रस्त्यावरील खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, मंगलताई कंथले, सविता मठपती, सुशिला चव्हाण, मिना बोळे, मीना शेवाळे, श्रीमती गिरी, श्रीमती कावळे यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्तींनी राणावत यांच्याविरूध्द जोरदार घोषणाबाजी केली. आणि वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading