Sunday, September 6, 2026
PUNE

PMP बस सेवा सुरू; वंचितच्या डफली बजावो आंदोलनाचा विजय

पुणे, दि. ३ – शहरातील पीएमपी बसेस आजपासून सुरु झालेल्या असुन हा वंचित बहुजन आघाडीच्या डफली बजावो आंदोलनाचा विजय आहे.वंचित बहुजन आघाडीकडून या निर्णयाचे स्वागत चालक व वाहक यांना पुष्प देऊन व पेढे वाटुन करण्यात आले. वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुणे मनपा ते विश्रांतवाडी अस‍ा बस प्रवास करुन प्रशासनाचे आभार मानले.वंचित आघाडीच्या पाठपुराव्याने बस चालु झाल्याने चालक- वाहक व प्रवाशांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आबेंडकर यांचे आभार मानले.यावेळी वंचितचे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी,महासचिव जितेंद्र जाधव,ज्ञानेश्वर चव्हाण,बाळासाहेब बनसोडे,विवेक लोंढे,अनिल गायकवाड,पितांबर धिवार,संजय कांबळे,प्रफुल्ल काकडे,देवानंद शिंदे,विनोद शिंदे,योगेश अवचरे,संजय पोळ,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष शुभम चव्हाण, महासचिव कोस्तुभ ओव्हाळ,ओंकार कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading