Sunday, September 6, 2026
PUNE

आयसीएआय’तर्फे ५ व ६ रोजी ‘सहकार संवाद’

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या (पीडीसी) संयुक्त विद्यमाने ‘सहकार संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ५ आणि रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, उपाध्यक्ष सीए निहार जांबूसारिया, ‘आयसीएआय पीडीसी’चे चेअरमन सीए श्रीनिवास जोशी, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, माजी सदस्य सीए डॉ. एस. बी. झावरे. डब्ल्यूआयआरसीचे चेअरमन सीए ललित बजाज, सहकार समितीचे चेअरमन सीए यशवंत कासार पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांच्यासह सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे. सहकारी बँकांचे ऑडिट, करप्रणाली, सहकार चळवळ आणि अर्थव्यवस्था, सहकार क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान, सहकार क्षेत्रात सीएची भूमिका, सहकार क्षेत्र आणि जीएसटी आदी विषयांवर चर्चा होणार आहे, असेही सीए धामणे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading