Monday, June 15, 2026
PUNETOP NEWS

‘कोविड जम्बो सेंटर हेळसांड व व्यवस्थे’ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी – गोपाळदादा तिवारी

पुणे, दि. 4 – पुणे मनपात ‘भाजपची एक हाती सत्ता’ असून “एपिडेमिक व डिजास्टर मैनेजमेंट ॲक्ट अंतर्गत – ‘कोरोना संसर्ग हाताळण्यास संपूर्ण मुभा व मोकळीक असूनही” मनपा प्रशासनास परीस्थिती नियंत्रणात आणता येत नाही हे स्पष्ट झाले आहे.. एकीकडे राज्य सरकार ‘आवश्यक_निधी ते आरोग्य_अधिकारी’ देण्यापासून ‘कोविड सेंटर’ उभे करण्यापर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे… परंतु या सर्व बाबींचा लाभ दुर्दैवाने मनपातील सत्तास्थानी असलेल्या ‘भारतीय जनता पक्षास’ घेता आलेला नाही, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे.. अकार्यक्षम अधिकारी व पदाधिकारी’ यांचे मुळे पुणेकरांचा जीव वेशीवर टांगलेला असुन, पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
“कोविंड जम्बो सेंटरच्या” उभारणीमध्ये ‘अक्षम्य हेळसांड’ झाली असून, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ नसतांना(?) मात्र ‘सेंटर उभे करण्याची’ व ‘रक्कम खर्ची टाकण्याची’ झालेली घाई ही स्पष्ट होते आहे…!
मा महपौर दत्ताजी एकबोटे, पत्रकार पांडुरंग रायकर सह अनेक निष्पाप नागरिकांना केवळ ‘यंत्रणेतील त्रुटी, अक्षम्य हलगर्जीपणा व विस्कळीतपणा’ मुळे नाहक जीव गमवावा लागला आहे ही खेदजनक व संतापजनक घटना आहे…! ‘या विषयीची जबाबदारी व उत्तरदायित्व’ हे निश्चित करावेच् लागेल…! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना आपण ‘प्राप्त परिस्थितीमध्ये’ निवृत्त सनदी अधिकारी वा निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी करून दोषींवर सक्त कारवाईची मागणी काॅंग्रेस पक्ष करत असल्याचे प्रदेश काॅंग्रेस चे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
कोरोनाची साथ सुरू होऊन ५ महिने झाले, तरी पुणे मनपा प्रशासन नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. ऑक्सिजन, आयसीयू बेड व व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे. ‘जम्बो सेंटर’ सुरू करण्यापुर्वी मनपा ची बंद असलेली रुग्णालये वास्तविक तातडीने सुरू करणे आवश्यक होते व आहे.. महापालिकेच्या सुसज्ज इमारती बांधूनही बंद अवस्थेत असलेली रुग्णालये प्राधान्याने ‘कोविड उपचारार्थ’ सुरू करणे गरजेचे होते व आहे.. आरोग्य विभागातील अद्याप ‘रिक्त पदे’ भरण्याची गरज आहे.. इत्यादी ‘महत्वपुर्ण बाबींकडे’ ही गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading