fbpx
Friday, April 26, 2024

पं. अतुलकुमार उपाध्ये

Latest NewsPUNE

व्हायोलिन वादन विद्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव

पुणे : गुरुवर्य बा. शं. उपाध्ये यांच्या जन्मशताबदीनिमित्त उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयातर्फे गुरुपौर्णिमा आणि स्नेहमेळाव्याचे आयोजन मित्र मंडळ सभागृहात करण्यात

Read More
Latest NewsPUNE

‌‘फाउंडेशन ऑफ म्युझिक’ पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : डॉ. पं. विकास कशाळकर

पुणे : संगीत ही समन्वय साधणारी, समृद्ध आणि पवित्र कला आहे. संगीत केलेतून सन्मान, आदर आणि नवता मिळते. समाज सुसंस्कृत आणि आनंदी राहावा यासाठी संगीत कलेचे योगदान खूप मोठे आहे. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना संगीतविषयक गोडी लागावी यासाठी ‌‘फाउंडेशन ऑफ म्युझिक‘ हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्व व उत्तम आशय या पुस्तकाद्वारे अभ्यासकांपर्यंत निश्चित पोहोचू शकेल, असा विश्वास प्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. पंडित विकास कशाळकर यांनी व्यक्त केला. जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये आणि कवी, लेखक डॉ. अरविंद दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘फाउंडेशन ऑफ म्युझिक‘ या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कशाळकर, पद्मश्री विजय घाटे, व्हायोलिन वादक शिरीष उपाध्ये, पंडित अतुलकुमार उपाध्ये, डॉ. अरविंद दामले, महाराष्ट्र राज्य संगीत शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर चिंचोले, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य रमाकांत पैंजणे यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी डॉ. कशाळकर बोलत होते. गुरू बा. शं. उपाध्ये यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्या सप्तदशक पूर्तीचा योग साधून पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. कशाळकर म्हणाले, लवकरच येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात सर्वात जास्त संधी संगीत या कलाप्रांतात उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना संगीत कलेविषयी जागरूक करून उत्तम कानसेन निर्माण करणे या उपक्रमातून लहान वयातच विद्यार्थ्यांना संगीत या कलेविषयी गोडी निर्माण होऊन त्यांच्यावर संगीताचे संस्कार होतील. विजय घाटे म्हणाले, सध्याच्या काळात संगीताविषयी जागृती करताना उत्तम कानसेन निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच मुलांना संगीत या कलेविषयी आवड निर्माण करणे, वाद्यांचे ओळख करून देणे, संगीत ऐकण्यासाठी कान तयार करणे ही काळाची गरज आहे. पुस्तकनिर्मितीमागील भूमिका मांडताना पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले,‘फाउंडेशन ऑफ म्युझिक‘ या पुस्तकाची निर्मिती म्हणजे माझ्या आयुष्यातील मोठा टप्पा आहे. संगीत हा जीवनाचा अविभाज्य भाग असावा, विद्यार्थी दशेतच मुलाना संगीत या कलेविषयी मुलभूत माहिती उपलब्ध करून द्यावी, रागांचे एकमेकांशी असणारे नाते उलगडावे, विविध वाद्यांची माहिती व्हावी, कानसेन तयार व्हावेत. शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या मनात कलेची जाण निर्माण होते. मुलभूत शिक्षणातून कलाकार घडणे शक्य नसले तरी मुलांमध्ये एकाग्रता वाढण्यासाठी संगीत शिक्षण उपयुक्त ठरेल, असेही पंडित उपाध्ये यांनी नमूद केले. शालेय जीवनात संगीत या कलेविषयी आवश्यकता शासनाने समजून घेवून संगीतविषयक कला शिक्षकांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा रमाकांत पैंजणे, चंद्रशेखर चिंचोले यांनी व्यक्त केली.

Read More
Latest NewsPUNE

स्वरमल्हार महोत्सवात नृत्य, व्हायोलिन वादन आणि गायन यांची रसिकांनी घेतली अनुभूती

पुणे  : ओर्लीकॉन बाल्झर्स आणि व्हायोलिन अकादमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या स्वरमल्हार महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी कथक

Read More
Latest NewsPUNE

स्वरझंकार महोत्सवात आर्य संगीत प्रसारक मंडळाचा सन्मान

– पं संजीव अभ्यंकर यांचे गायन व ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं अतुलकुमार उपाध्ये यांच्या बहारदार वादनाने रंगला महोत्सवाचा तिसरा दिवस पुणे

Read More
Latest NewsPUNE

पुण्यात ५ ते ८ जानेवारी दरम्यान रंगणार स्वरझंकार महोत्सव

पुणे : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेला ‘स्वरझंकार’ हा सांगीतिक महोत्सव यंदा ५ ते ८ जानेवारी दरम्यान कर्वेनगर परिसरातील डी पी

Read More
Latest NewsPUNE

‘विरासत’ महोत्सवाला सुरुवात

पुणे – रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कथक नृत्याविष्कार, तसेच व्हायोलिनची सुरीली जुगलबंदी याने विरासत महोत्सवाला आज सुरुवात

Read More
Latest NewsPUNE

प्रेरणा संगीत संस्थेतर्फे दोन दिवसीय ‘संगीत मैफल’चे आयोजन

पुणे  : प्रेरणा संगीत संस्थेतर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘संगीत मैफल’ या दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात

Read More
Latest NewsPUNE

स्वरमल्हार महोत्सवाला उत्साहात सुरवात

पुणे  :  व्हायोलिन आणि सितारचे बहारदार वादन अनुभवत रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ‘स्वर मल्हार‘ या संगीत महोत्सवाचे. व्हायोलिन अकॅडमी आणि ऑर्लीकॉन बाल्झर्स यांच्या संयुक्त

Read More
Latest NewsPUNE

पं. अतुलकुमार उपाध्याय यांच्या व्हायोलीन वादनाची भुरळ

पुणे : कलाश्री महोत्सवाचा दुसरा दिवस उस्ताद अर्षद अली खान यांचे शास्रीय गायन आणि पं. अतुलकुमार उपाध्याय यांच्या व्हायोलीन वादनाने

Read More
PUNE

कलाकार त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो – ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये

कलाकार त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो – ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये

Read More