Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

प्रेरणा संगीत संस्थेतर्फे दोन दिवसीय ‘संगीत मैफल’चे आयोजन

पुणे  : प्रेरणा संगीत संस्थेतर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘संगीत मैफल’ या दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पहिल्या दिवशी उदयोन्मुख कलाकार आपली कला सादर करतील, तर दुसऱ्या दिवशी भारतभरातील संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. हा कार्यक्रम नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे २४ आणि २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून, त्यासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.

कार्यक्रमात पहिल्या दिवशी प्रेरणा संगीत संस्थेच्या प्रमुख आणि जयपूरच्या अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्यासह त्यांचे शिष्य गौरी दासरी, मंजिरी लक्रस, अपूर्वा देशपांडे, निशिगंधा देशमुख, कनिष्का आपटे, अवनी, सायली किणीकर, नितीन महाबळेश्‍वरकर, श्रेयसी सबनीस (सरोद), रुची शिर्से, पराजा शिरसेद, श्रेयसी सबनीस, शुभम नाडगौडा, वेदवती परांजपे, आदिती नगरकर, सौद्या कुलकर्णी, वृंदा बाम, कपिल सरदार, रुचा खोत, मधुरा पेठे, क्रांतीशीला ठोंबरे, मयुरा मांगले, सारिका केंद्रेकर आणि अनुराग जोशी (बासरी) हे कलाकार आपली कला सादर करतील. त्यांना  कार्तिक स्वामी दहिफळे, सचिन पावगी, तुषार केळकर आणि माधव लिमये हे साथसंगत करतील.

दुसऱ्या दिवशी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. यामध्ये  ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अमरेंद्र धनेश्वर यांचे गायन, व्हायोलिनवादक स्व. बाळकृष्ण उपाध्ये यांचे नातू आणि पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे पुत्र  राजस उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन, संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे शिष्य शहनाई वादक पं. लोकेश आनंद, प्रसिद्ध  बासरीवादक अमर ओक यांचे पुत्र अभय ओक आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन रसिकांना अनुभवता येणार आहे. प्रमुख कलाकारांना पं. रामदास पळसुले, सचिन पावगी, आशय कुलकर्णी, कार्तिकस्वामी, माधव लिमये आणि प्रज्ञा देसाई हे कलाकार साथसंगत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading