Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘एक नई फौज’ नाटकाची प्रस्तुती.

पुणे : एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल (ईआयएस) ने भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे अभिमानाने साजरी केली, आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पहाटेची आठवण करून देत ‘एक नई फौज’ नावाचे नाटक प्रस्तुत केले, ज्याद्वारे त्यांनी आपल्या ऐतिहासिक स्वातंत्र्य चळवळीला आदरांजली अर्पण केली. ते ‘आझादी का अमृत महोत्सव’ या सरकारी मोहिमेचा हिस्सा बनले होते.
यावेळी श्याम आणि सुमन सिरूर, (COTMAC ग्रुपचे अध्यक्ष आणि संचालक, जे परफॉर्मिंग आर्ट्सचे सदस्य देखील आहेत) , पद्मश्री शेखर सेन आणि श्वेता सेन ( शेखर सेन हे प्रसिद्ध गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत जे त्यांच्या “तुलसी”, “कबीर”, “विवेकानंद” साहब” आणि “सूरदास” या संगीत नाटकांसाठी प्रसिद्ध आहेत) हे मान्यवर या महोत्सवासाठी उपस्थित होते . मातृभूमीबद्दल प्रेम आणि आदराची भावना जागृत करणाऱ्या संगीतमय सादरीकरणाने या उत्सवाची सुरुवात झाली. देशभक्तीच्या भावतुन ईआयएस ने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कथेभोवती केंद्रित असलेले ‘एक नई फौज’ नावाचे विशेष नाटक दाखवले. हे नाटक कवयित्री आणि भारतातील काही महिला नाटककारांपैकी एक असलेल्या जया सरकार यांच्या मनाची उपज आहे. बॉलीवूड, टीव्ही मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कला दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या जयंत देशमुख यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ‘एक नई फौज’ ने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या दृष्टीतुन स्वातंत्र्याचे मर्म सुंदरपणे टिपले व राष्ट्रभक्तीच्या भावना जागृत केल्या. या शो चा प्रीमियर जुलैमध्ये नेताजींचे जन्मस्थान कटक येथे झाला होता.
एल्प्रोला पश्चिम भारतात ते होस्ट करणारी पहिली संस्था असल्याचा अभिमान वाटतो. यावेळी रंगमंचावर जणूकाही राष्ट्रीय अभिमानाच्या, इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या तेजस्वी रंगमय छटा प्रकट झाल्या. भारताच्या समृद्ध ऐतिहासिक भूतकाळाचा , वैभवाचा अभिमान विद्यार्थ्यांमध्ये दिसुन आला. या निमित्ताने शालेय समुदायामध्ये सामूहिकता, बंधुता आणि एकतेची भावना वाढली. संचालीका व प्राचार्या, डॉ. अमृता वोहरा यांनी या प्रसंगी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्या म्हणाल्या, मला अशा गौरवशाली इतिहासाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो आणि मला आनंद आहे की भारत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने साकार करून पुढे वाटचाल करत आहे. त्या पुढे म्हणाल्या, आम्हाला आमच्या शाळेच्या सभागृहात असे थिएटर नाटक आयोजित करण्याचा मोठा अभिमान वाटतो. आमचे स्कूल थिएटर आणि फिल्म मेकिंगच्या कलेचा प्रचार करते, आणि मला हे सांगताना खूप आनंद होतो की इयत्ता १० वी नंतर फिल्म मेकिंग हा विषय म्हणून सादर करणारी एल्प्रो ही पुण्यातील एकमेव शाळा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading