Sunday, September 6, 2026
BusinessLatest News

विश्वेश्वर बँकेच्या अध्यक्षपदी सुनिल रुकारी यांची बिनविरोध निवड

पुणे  :  विश्वेश्वर सहकार बँकेच्या अध्यक्षपदी सुनिल नामदेवराव रुकारी यांची व अजय चंद्रशेखर डोईजड यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली. बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत ही निवड करण्यात आली. मंडळातर्फे वर्ष 2022-23 साठी ही निवड करण्यात आली असून, ॲड. शशिकांत प्रभाकर कुलकर्णी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. सुनिल रुकारी हे प्रगतीशील शेतकरी असून, विविध सामजिक संस्थाशी संबंधित आहेत. तर अजय  डोईजड हे कोल्हापूर येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आहेत. बँकेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना रुकारी यांनी आपल्या बँकेचे यंदा  सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, आगामी काळात बँकेचा व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच एनपीए प्रमाण शून्य टक्के करण्याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सरव्यवस्थापक राम दराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading