Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

दहीहंडीच्या जल्लोषात ‘वाचन संस्कृतीचा’ जागर

 

पुणे : ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमलेला परिसर, कृष्णनामाच्या जयघोषाने भारलेले वातावरण आणि दहीहंडी फोडण्याच्या क्षणाची उत्कंठा… अशा वातावरणात नवदिप तरुण मंडळ ट्रस्ट, कसबा पेठ यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. उत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीच्या संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन नवदिप तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष तुषार शिंदे यांनी केले होते. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

वाचन संस्कृती टिकावी, तिचा प्रसार आणि विकास व्हावा, या उद्देशाने वाचन क्षेत्रात कार्यरत शेअर विथ इंडिया फाउंडेशन, कस्तुरी फाउंडेशन आणि वंचित विकास सामाजिक विकास संस्था या तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख स्वरूपात मदत देण्यात आली. नवदिप तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

दहीहंडी उत्सवात ‘गंधार’ आणि ‘कल्लोळ’ या ढोल पथकांनी दमदार वादन केले. अभिनेत्री माधुरी पवार आणि लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अखेरीस नवयुग दहीहंडी पथक, कसबा पेठ यांनी दहीहंडी फोडली. यावेळी परिसरात श्रीकृष्ण नामाचा जयघोष करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading