सुंदर हस्ताक्षरासाठी शाईचा पेन परिणामकारक – शां.ब.मुजुमदार
पुणे : “ पेन, शाई, शिक्षण आणि विद्यार्थी यांचे अगदी जवळचे नाते आहे. शाई पेनाच्या समोरील टोकाला एक नीब असते, तो वापरताना तुमच्या हाताला एक वळण मिळते आणि पर्यायाने तुमच्या हस्ताक्षराला वळण मिळते. त्यामुळे सुंदर हस्ताक्षरासाठी शाईचाच पेन वापरला पाहिजे, असा सल्ला पुण्यातील सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब मुजुमदार यांनी दिला. व्हीनस ट्रेडर्सतर्फे त्यांच्या फर्ग्युसन रस्ता येथील दालनात पेनच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विशेष सुविधेचे उद्घाटन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले त्यावेळी व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, प्रमोद करमचंदानी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुजुमदार म्हणाले, “ शिक्षण क्षेत्रात पेन हे महत्वाचे आयुध आहे. मला लहानपणापासूनच पेनाविषयी विशेष आकर्षण आहे. पूर्वी पेन खरेदी करणे विशेषतः फौउंटन पेन खरेदी करणे ही चैनीची वस्तू समजली जात असत. पेनविषयी मनात कायमच एक आपुलकी असते आणि सुंदर हस्ताक्षरासाठी फौउंटन पेन हा एका उत्तम पर्याय आहे.’’
पेनाचे चाहते आणि सुंदर हस्ताक्षर या विषयावर काम करणारे शैलेश जोशी म्हणाले, “ मी स्वत: एक कॅलीग्राफी कलाकार आहे. शाई पेन हे आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासात मदत करतात. जेव्हा आपण शाईच्या पेनाने लिहितो, त्यावेळी आपल्या मेंदूतील काही भाग सक्रीय होतो आणि आपल्याला लिहायची इच्छा होते. त्यातून आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो. त्यामुळेच डिजिटल युगातही पेनाचे महत्व अजून कमी झालेले नाही.’’
तसेच करोना काळात अनेक गोष्टीना डिजिटल स्वरूप प्राप्त होऊ लागले. मात्र असे असतानाही, हल्लीच्या संगणकाचा की-बोर्डच्या युगातही विविध प्रकारच्या पेनचे महत्व अजूनही कायम असून, अलीकडील काळात पेन’च्या वापरात तब्बल २५ टक्यांनी वाढ झाली असल्याची माहिती व्हीनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली.
या सुविधेबाबत अधिक माहिती देताना करमचंदानी म्हणाले, “आपल्याकडे तरुण, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ अशा सर्वच वयोगटातील नागरिकांना पेन’ची अतिशय आवड आहे. वकील, डॉक्टर, वास्तुविशारद अशा विविध क्षेत्रातील लोकांकडून खास बनावटीच्या पेन’साठी विशेष पसंती दिली जाते. कॉर्पोरेट क्षेत्र असो की वैयक्तिक सबंध पेन हे पहिल्या पसंतीची भेटवस्तू ठरते. त्यामुळेच की- बोर्ड’च्या युगातही पेन’ चे महत्व अद्याप कायम असून, काही जणांकडून विविध प्रकारच्या बनावटीतील पेनांचे संग्रहदेखील केले जाते. त्यातूनच आम्ही पेन प्रेमींसाठी एक खास सुविधा घेऊन आलो आहोत.’’
करमचंदानी म्हणाले, “ व्हीनस ट्रेडर्स’च्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरातील दुकानात तब्बल ५० देशी- विदेशी ब्रान्ड’चे प्रीमियम रेंज मधील पेन पहायला मिळणार आहेत. पेन’च्या चाहत्यांसाठी आम्ही ही खास सुविधा घेऊन आलो आहे. याठीकाणी फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टी फंक्शनल पेन अशा विविध प्रकारातील पेन उपलब्ध असणार आहेत. भारतातील क्लिक, वझीर, पार्कर अशा भारतीय ब्रान्डसोबतच क्रॉस, लेमी, पायलट, वोटरमेन, शेफर्स’सारख्या विदेशी ब्रान्ड’च्या पेन’चा समावेश असणार आहे. यांची किंमत साधारण १००० रुपयांपासून २,५०,००० रुपये इतकी असणार आहे. पेन’सोबतच ब्रान्डेड पेन्सिल, साधारण ५०० रुपयांपासून ते ४००० रुपयांपर्यंतची ब्रान्डेड शाई आणि फाउंटन पेनफ्रेंडली नोटबुक देखील नागरिकांना याठिकाणी पाहता येणार असल्याचेही करमचंदानी यांनी सांगितले.
