Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

स्वरमल्हार महोत्सवाला उत्साहात सुरवात

पुणे  :  व्हायोलिन आणि सितारचे बहारदार वादन अनुभवत रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते स्वर मल्हार या संगीत महोत्सवाचे.

व्हायोलिन अकॅडमी आणि ऑर्लीकॉन बाल्झर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २ व  ३  जुलै रोजी गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे आयोजित सातव्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहाने सुरवात झाली.  ‘ अ प्रेयर टू द गॉड फॉर द रेन ‘ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. याप्रसंगी ऑर्लीकॉन बाल्झर्स‘चे कंट्री प्रेसिडेंट आणि रिजनल डायरेक्टर प्रवीण शिरीषे, पंडित अतुलकुमार उपाध्ये
१९५१ साली स्थापना झालेल्या व्हायोलीन विद्यालयाला यंदा ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर विद्यालयाचे संस्थापक आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे वडील स्व. बाळकृष्ण शंकर उपाध्ये यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असा, दुहेरी योग साधून यंदा अकॅडमी तर्फे ‘ व्हायोलिन’ वर्ष साजरे केले जात आहे. याचं उपक्रमाची सुरवात स्वरमल्हार या महोत्सवाने होत असून, महोत्सवात व्हायोलिन वादनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.महोत्सवाची सुरुवात पंडिता एन राजम यांच्या कन्या संगीता शंकर आणि त्यांच्या दोन कन्या नंदिनी व रागिणी यांच्या  व्हायोलीन वादनाने झाली. त्यांनी विलंबित एकतालाद्वारे राग मियामल्हार’ ची सुरवात केली. त्यानंतर तीन तालात मध्यलय सादर केला. त्यानंतर अळाचार तालात पंडित बळवंतराय भट यांची रचना सादर केली. ‘बरसन लागे बदरिया रूम झूम’ या बनारसी कजरीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.

त्यानंतर प्रसिद्ध सितारवादक उस्ताद शुजात हुसैन यांचे वादन झाले. त्यांनी तीन तालातील राग गौड मल्हारद्वारे आपल्या वादनाला सुरवात केली. ‘ छाये बदरा काली काली ‘ ही बंदिश सादर केली. त्यानंतर त्यांच्या ‘ तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’, ‘खामोश लम्हे या गजल आणि राग पहाडी मिश्रमध्ये सादर केलेल्या  ‘ रंगी तोरी गुलाबी चूनारिया रे ‘  या शायरीला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दोन्ही कलाकारांना पंडित मुकेश जाधव यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading