Saturday, June 20, 2026
BusinessLatest News

शॉपर्स स्टॉपने द पॅव्हेलियन मॉलमध्ये नवीन फ्लॅगशिप स्टोअर केले सुरू

 

पुणे : शॉपर्स स्टॉप या भारतातील प्रीमियम फॅशन, ब्युटी आणि गिफ्टिंग गंतव्‍याने पुण्यातील पॅव्हेलियन मॉल येथे आपल्‍या नवीन फ्लॅगशिप स्टोअरच्‍या लाँचची घोषणा केली आहे. यासह महाराष्ट्रातील सर्वात गतिमान आणि वेगाने वाढणारी ग्राहक बाजारपेठ पुणे शहरात कंपनीने आपली रिटेल उपस्थिती अधिक दृढ केली आहे. पुण्‍यामध्‍ये शॉपर्स स्टॉपचे हे सहावे स्‍टोअर आहे.

२५,४८३ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे नवीन स्टोअर ग्राहकांना खरेदीचा उच्च दर्जाचा आणि विशेष अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे. येथे प्रीमियम फॅशन, सौंदर्य उत्पादने, अॅक्सेसरीज, फूटवेअर, लगेज आणि लाइफस्टाइल ब्रँड्सची विस्तृत श्रेणी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ खरेदीच्या पलीकडे जाऊन एक उत्तम ठिकाण म्हणून विकसित केलेल्या या स्टोअरमध्ये ग्राहकांसाठी अनेक अनुभवात्मक सुविधा समाविष्ट केल्या आहेत. यामध्ये एक समर्पित पर्सनल शॉपर लाउंज, किड्स प्ले एरिया आणि गेमिंग आर्केड यांचा समावेश आहे, ज्यामुळे ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सोयीस्कर आणि आनंददायी वातावरण तयार होते.

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत शॉपर्स स्टॉप लिमिटेडचे कस्टमर केअर असोसिएट, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. कविंद्र मिश्रा म्हणाले, पुण्यातील आमच्या नवीन स्टोअरची सुरुवात हा उत्साहवर्धक नवीन अध्याय आहे, जो शहरात प्रीमियम ब्रँड्सचा मोठा पोर्टफोलिओ आणि खरेदीचा उत्तम अनुभव घेऊन येत आहे. आम्ही पुण्यातील ग्राहकांसोबत आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यांना विनासयास व उच्च दर्जाचा खरेदीचा अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत.”

हे स्टोअर विविध श्रेणींमधील आघाडीच्या जागतिक आणि देशांतर्गत ब्रँड्सचा विस्तृत पोर्टफोलिओ एकाच छताखाली आणते. यामध्ये मेन्सवेअरमध्ये अरमानी एक्सचेंज, बॉस, केल्विन क्लेन, टॉमी हिलफिगर, जी-स्टार, गॅस आणि सुपरड्राय; विमेन्स वेस्टर्न वेअरमध्ये फॉरेव्हर न्यू, लेव्हिस, व्हेरो मोडा, रेअरइझम, युएस पोलो असोसिएशन आणि ओन्ली; इंडियन वेअरमध्ये लक्षिता आणि ग्लोबल देसी; लाँजरीमध्ये वाकोल; ब्युटी आणि फ्रॅग्रन्सेसमध्‍ये अरमानी ब्युटी, प्राडा ब्युटी, वायएसएल ब्युटी, मॅक, क्लेरिन्स, क्लिनिक आणि रॉबर्टो कव्हाली; सनग्लासेसमध्‍ये गुस्सी, रे-बॅन, व्हर्सासे, कोच, बरबरी आणि फेरागामो; घड्याळांमध्ये एम्पोरिओ अरमानी, चेरुती, केनेथ कोल, मायकेल कॉर्स आणि फॉसिल; हँडबॅग्जमध्ये गेस, जुईसी कुटूर आणि अल्डो; लगेजमध्ये सॅमसोनाईट आणि डेल्सी; फूटवेअरमध्‍ये एसिक्स, न्यू बॅलन्स, अॅडिडास आणि विझानो; तर ज्वेलरीमध्ये जिवा आणि गार्गी यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. हे स्टोअर ग्राहकांना एकाच छताखाली खरेदीचा अतुलनीय प्रीमियम अनुभव देते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading