Monday, October 12, 2026
Latest NewsPUNE

धर्मादाय वकील संघटनेतर्फे (पीटीपीए) मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे : धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (पीटीपीए) म्हणजेच धर्मादाय वकील संघटनेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील तसेच इतर उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा लाभ १०० हून अधिक व्यक्तींनी घेत मोफत नेत्र तपासणी करून घेतली.

या शिबिराचे उद्घाटन सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर, धर्मादाय उपायुक्त डॉ. राजेश परदेशी तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर अधिकाऱ्यांचीही नेत्र तपासणी करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी पीटीपीए धर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षा अॅड. अमृता गुरव, सचिव अॅड. रोहिणी पवार, उपाध्यक्ष अॅड. विजयकुमार केळेकर, खजिनदार अॅड. अश्विनी नलावडे, अॅड. दिलीप हांडे, अॅड. राजेश ठाकूर व माजी अध्यक्ष अॅड. शिवराज कदम-जहागीरदार, डोळे तपासणी साठी आलेले डॉ. सुलभा थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.

धर्मादाय क्षेत्रात कार्यरत असलेल्या वकील, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. डोळ्यांची नियमित तपासणी, दृष्टीदोषाचे वेळीच निदान आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.

पीटीपीए धर्मादाय वकील संघटनेतर्फे यापुढेही सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, कायदेविषयक जनजागृती आणि समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पीटीपीए धर्मादाय वकील संघटनेचा हा उपक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि वकील बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading