Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी नाकारली

 

मुंबई: प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलक मराठा आरक्षण आंदोलनाला आझाद मैदानावर न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. तरीही आंदोलन करण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्यामुळे मुंबई प्रवेश करताना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालय आम्हाला न्याय देईल खात्री आहे. आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेने होणार आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याला कोणीही बंदी घालू शकत नाही. आमच्याकडेही वकिलांची फौज तयार आहे, जरांगे म्हणाले.

दरम्यान, या निर्णयाबद्दल वकील गुणवंत सदावर्ते यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे. ज्या विषयाची न्यायालयात सुनावणी सुरू असेल त्याबाबत आंदोलन करता येत नाही, असेही ते म्हणाले. मुंबईमधील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांनी परवानगी घेतली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading