Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

वी ने नागपुरात ५जी सेवा सुरु केल्या

देशातील आघाडीची टेलिकॉम सेवा कंपनी, वी ने आजपासून नागपुरात आपल्या ५जी सेवा सुरु केल्या आहेत. २३ शहरांमध्ये वी च्या नियोजित ५जी विस्ताराचा हा एक भाग आहे. नागपूरनंतर आता पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये या सेवा सुरु केल्या जाणार आहेत. कंपनीला जिथे ५जी स्पेक्ट्रम मिळाले आहे त्या १७ प्रायॉरिटी सर्कल्समध्ये इतर रोलआउट सध्या सुरु आहेत.

भारतातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपल्या ५जी सेवांचा विस्तार करण्यासाठी वी ने मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगलोर, म्हैसूर, चंदिगढ आणि पाटणा यासारख्या प्रमुख शहरांमध्ये वी ने ५जी सेवा सुरु केल्या आहेत. ५जी मोबाईल असलेल्या नागपुरातील वी युजर्सना आजपासून वी ५जी सेवांचा लाभ घेता येईल. शुभारंभानिमित्त ऑफर म्हणून वी ने २९९ रुपयांपासून पुढच्या प्लॅन्सवर युजर्सना अनलिमिटेड ५जी डेटा देऊ केला आहे. हाय डेफिनिशन स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अधिक वेगवान डाउनलोड आणि रिअल-टाइम क्लाऊड ऍक्सेस यांचा लाभ ग्राहकांना घेता येईल.

वोडाफोन आयडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर श्री रोहित टंडन यांनी सांगितले, “नागपुरात वी ५जी लॉन्च करत असताना आम्ही ऑरेन्ज सिटीमध्ये कनेक्टिविटीचे भविष्य घेऊन येत असल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचे नेक्स्ट-जेन ५जी आणि आमच्या अनेक विविध ४जी सेवा यांच्यासह, आम्ही आमच्या युजर्सना अधिक जास्त पर्याय आणि अधिक जास्त अनुभव देऊ इच्छितो. वाढती मागणी आणि ५जी हॅन्डसेट वापरण्याचे वाढते प्रमाण यांना अनुसरून संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय पद्धतशीरपणे आमचा ५जी विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

नागपुरातील ग्राहकांना सर्वोत्कृष्ट ५जी अनुभव मिळावा यासाठी वी ने प्रगत, ऊर्जा सक्षम पायाभूत सोयीसुविधा तैनात करण्यासाठी एरिक्सनसोबत भागीदारी केली आहे आणि नेटवर्क परफॉर्मन्स आपोआप ऑप्टिमाइज करण्यासाठी एआय-पॉवर्ड सेल्फ-ऑर्गनायजिंग नेटवर्क कार्यान्वित केले आहे.

५जी विस्ताराबरोबरीनेच वी ने अधिक जास्त कव्हरेज, वेगवान डेटा स्पीड आणि एकंदरीत सर्वोत्कृष्ट अनुभव प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये आपले ४जी नेटवर्क लक्षणीय प्रमाणात अपग्रेड केले आहे. कंपनीने इनडोअर कव्हरेज मजबूत करण्यासाठी ७२५० साईट्सना ९०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम तैनात केले आहे तसेच ६७०० पेक्षा जास्त साईट्सना  २१०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम क्षमता वाढवली आहे. याखेरीज २२०० शहरांमध्ये २००० पेक्षा जास्त नवीन साईट्स वाढवल्या आहेत. हे सर्व अपग्रेड शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये सातत्यपूर्ण व उच्च गुणवत्तेची कनेक्टिविटी प्रदान करण्याची वी ची वचनबद्धता दर्शवतात.

ग्राहक आणि व्यवसायांच्या बदलत्या, वाढत्या डिजिटल गरजा पूर्ण करू शकेल असे, भविष्यासाठी सज्ज नेटवर्क उभारण्यासाठी वी वचनबद्ध आहे. उपलब्धता, किंमत आणि अनुरूप डिव्हायसेस यांच्याविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क करा – https://www.myvi.in/5g-network

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading