Friday, September 18, 2026
BusinessLatest News

रिवाह बाय तनिष्कचे नवे कलेक्शन ‘वेडिंग सिग्नेचर्स’, महाराष्ट्रीयन वधूच्या दागिन्यांच्या परंपरेची नवी व्याख्या.

पुणे : तनिष्कचा वेडिंग ज्वेलरी सब-ब्रँड, रिवाह बाय तनिष्कने ‘वेडिंग सिग्नेचर्स’ सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये सहा वेगवेगळ्या भारतीय समुदायांसाठी—तमिळ, तेलगू, राजस्थानी/मारवाडी, गुजराती, मराठी आणि पॅन-इंडिया/मेट्रो—वधूच्या दागिन्यांचा संपूर्ण संच उपलब्ध आहे. आधुनिक भारतीय वधूची तिच्या परंपरांशी जोडून राहण्याची आणि त्याच वेळी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा लक्षात घेऊन हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे.

आजच्या काळात लग्नाआधीच्या ८ ते १२ महिन्यांमध्ये, स्थळ, कार्यक्रम, फॅशन, फोटोग्राफी, सजावट, सौंदर्य आणि दागिने यांसंबंधीचे अनेक निर्णय वधू स्वतः घेते. या सर्वांची सांगड घालून ती तिच्या लग्नासाठी एक अनोखा लूक तयार करते. आधुनिक काळातील या बदलामुळे वधूच्या दागिन्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे; केवळ एकच मोठा सेट खरेदी करण्याऐवजी, वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळे दागिने निवडण्यास प्राधान्य दिले जाते. ‘वेडिंग सिग्नेचर्स’ने नेमकी हीच गरज ओळखली आहे आणि म्हणूनच यामध्ये लग्नाच्या प्रत्येक विधी व सोहळ्यासाठी दागिन्यांचा एक संपूर्ण संग्रह उपलब्ध आहे.

प्रत्येक वधूचा लूक दागिन्यांच्या सांस्कृतिक ओळखीवर लक्ष केंद्रित करून, खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे. मराठी वधूंसाठी असलेले हे विशेष कलेक्शन पारंपरिक दागिन्यांच्या समृद्ध वारशाचा सन्मान करते. हे दागिणे सोने, माणिक, कुंदन आणि मोती यापासून बनवलेले आणि आधुनिक शैलीत सादर केले आहेत. चिंचपेटी, ठुशी, तन्मणी मंगळसूत्र आणि कोल्हापुरी साज यांसारखे प्रतिष्ठित पारंपरिक मराठी दागिने, तसेच नथ, अंबाड्यावरील पिन, इअर कफ आणि कानातले हे वधूचा लूक पूर्ण करतात आणि तिच्या लूकची ओळख बनतात. आनंद, समृद्धी, संरक्षण आणि वैवाहिक सुखाची पारंपरिक प्रतीके या अनोख्या दागिन्यांच्या डिझाइनमध्ये सुंदरपणे समाविष्ट करण्यात आली आहेत. रत्नांचे आकर्षक रंग आणि नाजूक कारीगरी त्यांचे सौंदर्य आणखी वाढवतात. हे दागिने पारंपरिक मराठी शैली दर्शवतात, तरीही ते नवे आणि शानदार दिसतात आणि आजच्या आधुनिक वधूच्या आवडीनिवडीला अगदी साजेसे आहेत.

‘वेडिंग सिग्नेचर्स’ हे तनिष्कच्या डिझाइन एक्सलन्स सेंटरने तयार केले आहे. या नव्या कलेक्शनमध्ये वधूच्या दागिन्यांच्या सातही प्रकारांमध्ये प्रादेशिक परंपरा आणि आवडीनिवडी, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्स आणि उत्कृष्ट कारीगरी यांचा सुरेख संगम ठळकपणे दिसतो.

या कलेक्शनसाठी “वन वेडिंग. मेनी स्टोरीज” हे विशेष कॅम्पेन तयार करण्यात आले आहे. यामध्ये फक्त दागिनेच नाही तर डेस्टिनेशन फोटोग्राफी आणि फिल्मच्या माध्यमातून संपूर्ण विवाह इकोसिस्टिमला समाविष्ट करून घेण्यात आले आहे. प्रसिद्ध वेडिंग फोटोग्राफर जोसेफ राधिक यांनी जयपूरमधील प्रतिष्ठित ताज जयमहल पॅलेसमध्ये निवडक वधूंचे लूक सुंदर पद्धतीने टिपले आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी प्रादेशिक चित्रपटांच्या मालिकेच्या माध्यमातून या कथांना जिवंत केले आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन दक्षिण भारतीय बाजारपेठांसाठी ‘रिवाह’चा चेहरा आहे. हे कॅम्पेन दागिन्यांना लग्नाचे वातावरण, पार्श्वभूमी आणि वेगवेगळ्या प्रसंगांशी सुंदरपणे जोडते, ज्यामुळे संपूर्ण कलेक्शनभोवती एक उत्साही आणि उत्सवी वलय निर्माण होते.

तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर, श्रीमती पेल्की त्शेरिंग म्हणाल्या, “’रिवाह’मध्ये आम्ही मानतो की प्रत्येक वधू स्वतःसाठी एक अद्वितीय आणि खास लग्नसोहळा घडवते. आजच्या काळातील वधू आपल्या लग्नाबद्दलचा प्रत्येक निर्णय खूप विचारपूर्वक घेत आहेत. डेस्टिनेशन आणि समारंभांपासून ते फॅशन, फोटोग्राफी आणि दागिन्यांपर्यंत, त्यांची प्रत्येक निवड त्यांच्या स्वप्नातील लग्न प्रत्यक्षात साकार करण्यास हातभार लावते. वधूच्या दागिन्यांबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनातील हा बदल आम्हाला प्रतिबिंबित करायचा होता. ‘वेडिंग सिग्नेचर्स’ हे सात वेगवेगळ्या भारतीय समुदायांमधील वधूंच्या लूकसाठी दागिन्यांचे एक संपूर्ण कलेक्शन आहे. यामध्ये लग्नातील प्रत्येक विधी आणि प्रसंगाला साजेसे दागिने डिझाइन केलेले आहेत. आमच्या ‘वन वेडिंग. मेनी स्टोरीज’ या कॅम्पेनमधून, आम्ही या कलेक्शनला डेस्टिनेशन्स, फोटोग्राफी आणि फिल्मच्या व्यापक इकोसिस्टिमशी जोडत आहोत. वधूची पसंती आणि आवडनिवड केंद्रस्थानी ठेवून लग्नसमारंभ आणखी खास बनवणे, हा यामागील उद्देश आहे.”

‘रिवाह बाय तनिष्क’चे ‘वेडिंग सिग्नेचर्स’ कलेक्शन सर्व तनिष्क स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading