जागा ताब्यात नसताना डीपी रस्त्यावर कोट्यवधींचा चुराडा; अनेकवेळा उद्घाटने
पुणे:प्रचंड वाहतूक कोंडीला दररोज तोंड देणाऱ्या धायरी व सिंहगडरोड परिसरातील सहा लाखांवर रहिवाशांना पर्यायी रस्ता म्हणून धायरी सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता असा डीपी रस्ता तयार करण्यात येत आहे मात्र प्रस्तावित रस्त्यासाठी जमीन ताब्यात नसताना प्रशासनाकडून गेल्या चार पाच वर्षांपासून पुन्हा पुन्हा त्याच त्या ठिकाणी रस्त्याचे काम करून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात असुन या रस्त्यांचे अनेकदा उद्घाटने केली आहेत. मात्र प्रत्यक्षात रस्ताच अर्धवट अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. याबाबत सर्व पक्षीय हवेली तालुका नागरि कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील व संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
चव्हाण पाटील म्हणाले प्रत्यक्षात रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही एकाच ठिकाणी पुन्हा डांबरीकरण करण्यात येत आहे या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
जमीन मालकांनी रस्त्यासाठी समंती दिली असली तरी अद्याप भुमि अभिलेख विभागाने जागेची मोजणी केली नाही त्यामुळे उर्वरित रस्त्याचे काम रखडले केले आहे. असे सांगून चव्हाण पाटील पुढे म्हणाले, गेल्या चार पाच वर्षांपासून ठराविक ठिकाणीच रस्त्याचे काम सुरू आहे पुन्हा पुन्हा त्यासाठी खर्च केला जात आहे. त्यामुळे जनतेच्या पैसे वाया जात आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी वेळोवेळी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता . या निधीचा अपहार झाला असून त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी चव्हाण पाटील यांनी केली आहे.
