Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

बहुचर्चित ‘रघु ३५०’ चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा, कोणते कलाकार असणार याची उत्सुकता

आजवर रोमँटिक, ऍक्शन, रहस्यमय असे अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे ‘रघु ३५०’. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पोस्टरवरून हा चित्रपट एक आशयघन आणि रहस्यमय कथानक घेऊन मोठा पडदा गाजवण्यास सज्ज होत असल्याचं समोर आलं आहे. पण चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट ऍक्शनची साथ देणार की रोमान्सची याची उत्सुकता वाढून राहिली आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. अद्याप या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे समोर आलेलं नाही. चित्रपटाच्या पोस्टरवर असलेला बाईक चालवणारा तो तरुण नेमका आहे तरी कोण याचीही साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

‘सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट करण तांदळे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे.

रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे आगामी ‘रघु ३५०’ चित्रपटातून कळेल. बाईकवरून रावडी एन्ट्री घेतलेला तो इसम नेमका कोण आहे?, हे देखील गुलदस्त्यात असून या पोस्टरवरून हा चित्रपट ऍक्शनपट असल्याचं बोललं जातं. या नव्या कोऱ्या चित्रपटातून नेमकं कोणतं कथानक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार हे २ ऑगस्ट २०२४ रोजी कळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading