Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ह्युंडाईच्‍या आयओएनआयक्‍यू (IONIQ) फॉरेस्ट उपक्रमाने समुदायांना निसर्गाशी जोडले



जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) च्‍या सीएसआर शाखेने पुण्यातील डांगे चौक येथील आयओएनआयक्‍यू (IONIQ) फॉरेस्टमध्ये सामुदायिक सहभाग उपक्रमाचे आयोजन केले. निसर्ग आणि शाश्वततेचा उत्सव साजरा करण्यासाठी या उपक्रमात 120 हून अधिक विद्यार्थी, स्वयंसहाय्यता गट (बचत गट) आणि स्थानिक नागरिक एकत्र आले होते.
या उपक्रमामध्‍ये विविध अर्थपूर्ण कार्यक्रमांचा समावेश होता, जसे नेचर ट्रेल – मार्गदर्शित सफारी, ज्‍याद्वारे उपस्थितांना स्थानिक वृक्षारोपण पद्धती, जैवविविधता आणि पर्यावरणीय प्रभावाची माहिती देण्यात आली. संवादात्मक सत्रे – जंगल परिसंस्थेची उत्तम समज निर्माण करणे आणि अर्बन हीट आयलंड इफेक्ट (शहरी भागातील वाढते तापमान) रोखण्यात शहरी जंगलांची भूमिका स्पष्ट करणे, हा या सत्रांचा उद्देश होता. शाश्वत जीवनशैलीच्या पद्धती – मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सीड बॉल उपक्रम – उपस्थितांनी स्वतः स्थानिक बियांचा वापर करून सीड बॉल्स (बीज गोळे) तयार केले, ज्यामुळे त्यांना आपल्या आजुबाजूच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
या उपक्रमामध्‍ये फर्ग्युसन कॉलेज, हरीभाई व्ही. देसाई कॉलेज, लक्ष्मीबाई बारणे हायस्कूल, प्रेरणा हायस्कूल, खिवंसरा पाटील हायस्कूलचे विद्यार्थी आणि स्थानिक महिला स्वयंसहाय्यता गटांचे (बचत गट) सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आयओएनआयक्‍यू फॉरेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून एचएमआयएफने शाश्वतता, हवामान स्थिरता आणि समुदाय सहभागाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. हा उपक्रम फक्त झाडे लावण्यासाठी नव्हता, तर एका अधिक थंड, हरित आणि उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण करण्यासाठी होता.
[फोटो]
कॅप्शन:
ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनने (एचएमआयएफ) पुण्यातील डांगे चौक येथील आपल्या आयओएनआयक्‍यू (IONIQ) फॉरेस्टमध्ये समुदाय सहभाग उपक्रमाचे आयोजन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. एचएमआयएफद्वारे विकसित केलेले हे नागरी जंगल 90.5 एकर क्षेत्रावर पसरलेले आहे, जेथे शाश्वत मियावाकी पद्धतीने लागवड केलेली 10 लाखांहून अधिक विविध प्रकारची झाडे आहेत. जैवविविधता आणि शाश्वत जीवनशैलीचा उत्सव साजरा करण्यासाठी 120 हून अधिक विद्यार्थी, स्वयंसहाय्यता गट आणि स्थानिक नागरिकांनी विशेषरित्या आयोजित केलेल्या नेचर ट्रेल, खत निर्मिती कार्यशाळा आणि सीड बॉल उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. हा उपक्रम हवामान स्थिरता आणि हरित परिसंस्थेप्रती एचएमआयएफची कटिबद्धता अधिक दृढ करतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading