Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

अनुकरणीय गणेशोत्सव २०२६ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

पुणे : आगामी गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक, शिस्तबद्ध आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१, पर्यावरण विभाग अंतर्गत “माय सिटी माय प्रॉमिस” शिस्त व पर्यावरणपूरक वर्तन बदलासाठी अभियान आणि जय गणेश व्यासपीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “अनुकरणीय गणेशोत्सव २०२६ – मार्गदर्शन शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून लोकमान्य सभागृह, टिळकवाडा, नारायण पेठ येथे होणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक विष्णू भेडा व पीयूष शाह यांनी दिली

गणेशोत्सवातील विविध पैलूंवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या शिबिरात मिळणार आहे. इतिहासकार, लेखक व संशोधक मंदार लवाटे हे “गणेशोत्सव संस्कृती आणि सामाजिक महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन करतील. पारंपरिक कला पुनरुज्जीवनासाठी कार्यरत असलेले डिझायनर चंद्रशेखर भेडा (नवी दिल्ली) हे “गणेशोत्सव देखावे व रथ : कला, हस्तकला आणि नावीन्यपूर्णता” या विषयावर विचार मांडतील.

संगणक तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर हे “तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) चा वापर” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई हे ध्वनीप्रदूषण आणि लेझर लाईटमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देतील. तसेच रोटेरियन मनोज धारप हे निर्माल्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतील.

याशिवाय “नेट झिरो संकल्पना आणि अनुकरणीय गणेशोत्सव पारितोषिक २०२६” याबाबतही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमात नामवंत मंडळांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, रोटरीचे सदस्य, पोलीस अधिकारी, कलाकार आणि पत्रकार सहभागी होऊन चर्चासत्रात सहभाग नोंदविणार आहेत.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131,पर्यावरण विभागाचे प्रमुख राजेंद्रकुमार सराफ, महेश सूर्यवंशी, श्रीकांत शेट्टे, अण्णा थोरात, रवींद्र अण्णा माळवदकर, संजीव जावळे, शिरीष मोहिते, उदय जगताप ,संजय बालगुडे , बाळासाहेब मारणे, विकास पवार असे प्रमुख मंडळाचे कार्यकर्ते यांच्या चर्चासत्राने शिबिराची सांगता होणार आहे. गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि समाजाभिमुख करण्यासाठी कार्यरत असलेल्या गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading