Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

जाधवर ग्रुप च्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेतील शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम

 

पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्च्या शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालय, प्रा.डॉ. सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालय आणि पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ँड ज्यूनियर कॉलेजचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदाही १० वी व १२ वी च्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा जाधवर ग्रुप ने कायम राखली आहे.

शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा हिमांशू पाटील हा ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. आदित्य कुंभार ९१.८० टक्के गुण मिळवून द्वितीय तर संचित देवकर याला ८९.६० टक्के मिळाले असून त्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा वेदांत घडी ९२.२० टक्के मिळवून प्रथम, सिद्धीविनायक सावंत ८६.०० टक्के मिळवून द्वितीय व मानसी गायकवाड हि ८४.६० टक्के मिळवून तृतीय आली आहे. तसेच पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलची अनुजा गुंड ९३.६० टक्के मिळवत प्रथम, मारीषा शिंपी ९०.८० टक्के द्वितीय व संभाजी डिगोले याला ९०.२० टक्के गुण मिळाले असून त्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर व उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी विद्यार्थ्यांचे परिश्रम, सुनियोजन, अभ्यास आणि शिक्षकांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचे हे यश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गुणवत्तेकडे लक्ष देऊन अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading