Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

…. म्हणून पं नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार होते – उल्हास पवार

पुणे : ब्रिटीश गुलामगिरीत ‘पिचलेल्या, शैक्षणिक – तांत्रिक मागासलेल्या’ स्वतंत्र भारताचे पं नेहरूंनी रडगाणे न गाता नेतृत्व केले व पहीली मतदार यादी बनवून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही देशात प्रस्थापित केली म्हणूनच पं नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार होते.. असे उद्गार  काँग्रेस जेष्ठ नेते ऊल्हासदादा पवार यांनी काढले..!
पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यतिथी – स्मृतीदिना निमित्त काँग्रेस भवन येथे पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यकर्कमात ते बोलत होते..!
जेष्ठ पत्रकार श्री निरंजन टकले यांनी या प्रसंगी सांगितले की, ९०% निरक्षर देशाच्या मतदार यादी बनवण्याचे आव्हान होते..
२१ वर्षे वय पुर्ण असलेल्या स्त्री-पुरुष भारतीय नागरीकांची नोंद, दवंडी पेटवून व जनतेस विश्वासात घेवूनच पं नेहरूंनी राबवली.. त्यावेळी २५ वर्षांवरील पुरुषांचीच नोंद मतदार यादीत घेण्याची सुचना तत्कालीन जनसंघ – संघाची होती असेही श्री टकले यांनी सांगितले..!
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पं नेहरूंनी १० वर्षे पंतप्रधान पद सांभाळल्या नंतर लोकमताचा कौल मिळुनही इतरांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता मात्र जनतेच्या  रेट्या पुढे व अ भा काँग्रेस समितीच्या ठरावामुळे त्यांनी पुन्हा ३ ऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारले.. हा देखील आदर्श देशा समोर ऊभा आहे.. लोकशाहीप्रती समर्पणाची त्यांची भावना अनन्य साधारण होती असे देखील त्यांनी सांगितले.
कामगार नेते सुनील शिंदे, विरेंद्र किराड
भगवान कडू, ॲड फैयाझ शेख, गुलाम हुसेन, ॲड श्रीकांत पाटील, अनुसया गायकवाड, सुनिता तांबे, विशाल गुंड, सुनिल काकडे, सुनिल रोजकरी, मच्छिंद्र धुमाळ, विजय हरपळे, सोमनाथ गाडेकर इ पदाधिकारी उपस्थित होते..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading