Sunday, June 7, 2026
Latest NewsLIFESTYLE

संकल्प आर्ट फेस्ट प्रस्तुत समुह कला प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : संकल्प आर्ट फेस्ट’ हे सामुदायिक कलाप्रदर्शन नमह रॉयल बँक्वेट, गणेश मंदिर, गेट नं.३, वजीरा (डॉन बोस्को शाळेसमोर), बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे ४ व ५ मे २०२४ रोजी भरणार आहे. ते कलाप्रदर्शन सर्व कलाप्रेमी, रसिक व संग्राहकांना रोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनाचे आयोजन रुपाली मिस्त्री यांनी केले असून त्यांची चित्रे इतर ३६ कलाकारांच्या चित्रांसह येथे ठेवली जाणार आहेत. ह्या प्रदर्शनात ठेवण्यात येणारी विविधांगी चित्रे तैलरंग, जलरंग, ऍक्रिलिक रंग, पेन अँड इंक, चारकोल, इचिंग वगैरे माध्यमातील व तंत्रशुद्ध शैलीत असून त्यात सर्वांना वास्तववादी शैली, निम्नवास्तववादी शैली व अमूर्त शैलीतील कलाकृती वगैरेंचे कलात्मक दर्शन होईल. ह्या प्रदर्शनातील चित्रांमध्ये वैविध्य, कलात्मकता व तंत्रशुद्ध शैली ह्यांची सगळ्यांना अनुभूती होईल.

 

ह्या प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये निसर्गचित्रे, मनोविश्लेषणात्मक भावपूर्ण व्यक्तिचित्रे, शहरी व ग्रामीण जीवनशैली, संस्कृती व परंपरा दर्शविणारी चित्रे, ऐतिहासिक वास्तू, स्थिर वस्तू चित्रण वगैरेवर आधारित विविधांगी अशी राहतील त्यामुळे सर्वांना येथे चित्रकलेच्या अनेक कलात्मक पैलूंचे दर्शन घडेल.

ह्या वैशिष्ट्यपूर्ण सामूहिक कलाप्रदर्शनात सहभागी होणारे कलाकार –

रुपाली मिस्त्री – रुपाली आर्टस, उमा जोशी – मल्हार आर्टस, हंसा अशर, बीना जोशी, पार्थ राऊळकर, सर्वेश पाटील, प्राची कोतकर – क्रियेचरीये, उष्मा उदेशी – जरुखो आर्ट, अमृता घरात, संगीत वागळे, श्रेया चिचबंकर, जान्हवी गुडेकर, नम्रता शाह, श्रुति पुजारी, हेमांगी सुखाडिया – येशाज क्रियेशन, मेघना आकेरकर – मेघना आर्ट, मेघना गोथीवाला, स्नेहल गुप्ता, पायल विश्वकर्मा, परिधी व्होरा, प्रिती अर्ते, स्वाती नजरे – प्रिझम आर्ट, आरती हरसोरा – मेहेंदी आर्टिस्ट, निशित शाह, मेराकी टीस, श्वेता  एस. – सनिशा  क्रिएशन्स, जयश्री पवार, जुलेखा तातारी, यशवी श्रॉफ – संगथ क्रियेशन्स, श्वेता  शाह – ट्रीटस् आणि टाईज, लुबना मोहम्मद व प्राजक्ता आजगावकर, रुपा हरीदास, विविना शिरीन, भावना मेहता, सयानी मुजुमदार, सुनिल गोयल इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.

        ह्या प्रदर्शनात सर्वांना एकाच ठिकाणी आशयघन कलाकृती बघता येतील व त्यांचा आस्वाद घेता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading