Monday, June 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

टोनी ॲबॉट, आयुष्मान खुराना, पुलेला गोपीचंद राष्ट्र उभारणीच्या कल्पनांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येनार!

 

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा केवळ एक प्रतिभावान मल्टी-हायफेनेट अभिनेता-कलाकारच नाही तर एक विचारसरणीचा नेता आणि भारताचा युवा आयकॉन देखील मानला जातो.

आयुष्मानने देशावर महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव पाडला आहे. सर्वसमावेशकतेला प्राधान्य देणाऱ्या आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या विचारप्रवर्तक चित्रपटांनी त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे.

प्रतिष्ठित टाइम मासिकाने आयुष्मानच्या प्रचंड प्रभावाची कबुली देऊन त्याला जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आहे. राष्ट्र उभारणीतील योगदान आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना टाइम ने ‘टाइम इंपैक्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.

आयुष्मानची भारत स्पेशल ऑलिम्पिकसाठी सदिच्छा दूत म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या भारतासाठी युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आहेत आणि सॉकर दिग्गज डेव्हिड बेकहॅम यांच्यासोबत संयुक्तपणे EVAC – एरेडिकेशन ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन – या महत्त्वाच्या उपक्रमाचे प्रमुख आहेत!

जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान इतके आहे की आयुष्मानला आता ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट, बॅडमिंटन आयकॉन पुलेला गोपीचंद, अमीर हुसैन लोन – जम्मू आणि काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार, आणि इतर दिग्गजांसह भविष्यासाठी राष्ट्र उभारणी या विषयांवर चर्चा करण्यासाठी सामील करण्यात आले आहे!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading