Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा यूटर्न 

जालना : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी घ्यायचा आहे, त्यामुळे मीच सागर बंगल्यावर जातो, असे म्हणत मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांनी आता  यूटर्न घेतला आहे. जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये परतले आहेत.

मी फडणवीसचा कट हाणून पाडला

जरांगे म्हणाले, ‘काल मी मुंबईला निघाल्यानंतर आसापांच्या गावात संचारबंदी लागू करण्यात आली, हजारो पोलीस आम्हाला आडवण्यासाठी रस्त्यावर आले; काल मला आडवण्यासाठी अनेक मातामाऊली माझ्या पुढे उभ्या होत्या. मी तसाच पुढे गेलो असतो तर काय झालं असत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी फडणवीसचा कट हाणून पाडला, असे स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिले आहे.

संचार बंदी उठवली की मुंबईला जाणार  

जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. मी मुंबईला यायलो निघालो की फडणवीसांनी संचारबंदी लागू केली. आता आम्ही गेलो की आमच्यावर कारवाई करणार, त्यामुळे संचारबंदी उठवली की मी मुंबईला जाणारच. यावेळी एकटे न जातो सगळ्यांना घेवून जाणार. त्यासाठी एक नियोजन बैठक घेणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading