Monday, June 1, 2026
Latest NewsLIFESTYLE

सिग्‍नेचर ग्रीन वाइब्‍स फेस्टिवलचे दुसरे पर्व उत्साहात संपन्न

पुणे : सिग्‍नेचर ग्रीन वाइब्‍स फेस्टिवलचे दुसरे पर्व नुकतेच पुण्यात उत्साहात संपन्न झाले. शहरातील ग्रीन सीकर्सकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळण्‍यासह हे पर्व अत्‍यंत यशस्‍वी ठरले. वन विथ नेचर आणि हॅशटॅग लिव्ह गुड डू गुड संकल्‍पनेला चालना देण्‍याप्रती समर्पित या अद्वितीय इव्‍हेण्‍टमध्‍ये अमित त्रिवेदी यांच्‍यासारख्‍या प्रतिष्ठित कलाकारांचा समावेश होता, तसेच स्‍थानिक आर्टिस्‍ट्स ओएएफएफ म्‍युझिक एक्‍स सवेरा आणि आरिफ यांनी त्‍यांच्‍या मधुरमय परफॉर्मन्‍ससह इव्‍हेण्‍टमध्‍ये उत्‍साहाची भर घातली

संगीतमय आनंदासह फेस्टिवलमध्‍ये पाककला मेजवानीबरोबरच स्‍वादिष्‍ट फार्म-टू-टेबल पाककलांचा आस्‍वाद घ्‍यायला मिळाला, ज्‍यामध्‍ये मलाका स्‍पाइसचे शेफ रोहन महाबल यांनी स्‍थानिक पातळीवर स्रोत मिळवलेल्‍या घटकांपासून काळजीपूर्वक तयार केलेल्‍या मेन्यूचा समावेश होता. शाश्‍वत पाककलेप्रती कटिबद्धतेसाठी प्रसिद्ध कलनरी आर्टिस्‍ट शेफ रोहन महाबल यांनी उल्‍लेखनीय फार्म-टू-टेबल अनुभव दिला. उपस्थितांना स्‍थानिक पातळीवर स्रोत मिळवलेल्‍या आणि ऑर्गनिक घटकांपासून बनवण्‍यात आलेल्‍या स्‍वादिष्‍ट पाककलांचा आस्‍वाद घेण्‍याची संधी मिळाली, ज्‍यामुळे शहराप्रती सखोल संबंधांना चालना मिळण्‍यासह कार्बन फूटप्रिंट कमी झाले.

तसेच, सर्वसमावेशक डीआयवाय हरित क्रियाकलाप, मास्‍टरक्‍लासेस आणि अनेक उत्‍साहवर्धक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना अद्वितीय आनंद दिला. पर्यावरणप्रती जागरूकतेचा संदेश देत सिग्‍नेचर पॅकेज ड्रिंकिंग वॉटरने संपूर्ण फेस्टिवलदरम्‍यान आपले तत्त्व ‘लिव्‍ह गूड. डू गूड’ जपले, तसेच लँडफिल्‍समधील कचरा कमी करत पर्यावरणावरील परिणाम कमी करण्‍यासाठी स्‍क्रॅप झीरोवेस्‍टसोबत सहयोग केला.

डियाजिओ इंडियाचे उपाध्‍यक्ष आणि मार्केटिंगचे पोर्टफोलिओ प्रमुख वरूण कूरिच म्‍हणाले, ”सिग्‍नेचर ग्रीन वाइब्‍सचा पर्यावरणाप्रती जागरूक राहणीमानाप्रती कटिबद्धतेसह जीवन संपन्‍न करण्‍यावर विश्‍वास आहे. हा फेस्टिवल व्‍यक्‍तींसाठी स्‍वागतार्ह स्‍पेस तयार करतो, ज्‍यांची आमच्‍यासारखी एकत्र येण्‍याची समर्पितता आहे आणि स्‍वत:ला निसर्गाच्‍या सौंदर्यामध्‍ये सामावून घेतात, तसेच ‘लिव्‍ह गूड. डू गूड’ तत्त्व अंगिकारतात. आम्‍ही सर्वांना या संयुक्‍त प्रयत्‍नामध्‍ये सामील होण्‍याचे आवाहन करतो, जेथे आम्‍ही एका वेळी एका फेस्टिवलसह हरित भविष्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत.”

फेस्टिवल उपस्थितांना परिवर्तन अंगिकारण्‍यास प्रेरित करते, ज्‍यासाठी कोणतीच कसर न सोडता फेस्टिवलमध्‍ये वापरण्‍यात येणारे प्रत्‍येक घटक रियूजेबल असण्‍याची खात्री घेते. ब्रॅण्‍ड देखील नेचरवर सकारात्‍मक छाप निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, आयजीएसएसएससोबत सहयोगाने ब्रॅण्‍ड ५ गावांना समाविष्‍ट करत ओडिशाच्‍या किनारपट्टीवर नष्‍ट होत असलेल्‍या खारफुटीचे संवर्धन करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading