Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  ३९४ व्या  जयंतीनिमित्त, दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत होता, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तसेच काही ठिकाणी मिरवणुकी देखील होते.

याच निमित्ताने सलग चौथांदा यशस्वी रक्तदान शिबिर कार्यक्रम उत्साहात साजरी झाली. या रक्तदान शिबिराला सुरुवात करणारे आपल्या समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव तसेच आताचे ट्रस्टी उपाध्यक्ष श्री. गोपाळ चव्हाण यांनी या रक्तदान शिबिराची सुरुवात केली होती ती आता श्री. सो. स. क्षत्रिय समाज युवक संघटना मार्फत दरवर्षी यशस्वी पार पडते यात दुमत नाही.

या रक्तदान शिबिरा निमित्त साधत आपल्या समाजाला राजकीय पक्षाचे मार्गदर्शन लाभत असून या वेळी श्रीमती. कमलताई व्यवहारे, श्री. हेमंत भाऊ रासने तसेच पोलिस अधिकारी वर्ग आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराला श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे A-१६ अध्यक्ष श्री. मनोज आरसिद्ध व सचिव  अनिल दामजी आणि संपूर्ण कार्यकारणी या वेळी उपस्थित होते. आपल्या समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव  बाळासाहेब पवार व आपल्या समाजाला वैद्यकीय सेवा देणारे   दिनेश रंगरेज हेही उपस्थित होते. श्री. सो. स. क्षत्रिय समाजाचे महिला मंडळ यांच्या कडून  शशिकला आरसिद्ध,   पुष्पा वखारे,   विना दलभंजन  मेघा पवार,  अर्चना कोल्हापुरे,  विजया चौधरी,  सायली कटारे,   शैला मिस्किन हेही उपस्थित होते तसेच श्री. सो. स. क्षत्रिय समाज वधू वर सूचक मंडळ कडून  राजेंद्र पवार,  सुनील मिस्कीन,  श्रीकांत मिस्कीन,  बंडू बाकळे,   राजेश भांडगे व  मेघश्याम झाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading