Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

विविध जन संस्कृतीच्या अभिव्यक्तीचा प्रवास संविधान कलामहोत्सवातून उलगडला


पुणे:संविधान हा केवळ एक कायदेशीर ग्रंथ नसून ते इथल्या जनतेच्या आशा आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळेच संविधानाच्या गाभ्याशी असणारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, सद्भावना ही मूल्ये ही या देशातील बहुविविध जनसंस्कृतींमध्येही आढळतात. नव्या संदर्भात या पुरोगामी मूल्यांचा जागर करण्याची गरज तसेच नैराश्य, द्वेष व नकारात्मकतेला छेद देत एक सकारात्मक समाज घडविण्यासाठी जन सांस्कृतिक चळवळीच्या पुढाकाराने या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


या महोत्सवाला ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, प्रसिद्ध अभिनेत्री रसिका आगाशे, राष्ट्र सेवा दलाचे नितीन वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. समयसूचकता व आजच्या काळाला आव्हान देणाऱ्या चित्रांचा रंग आविष्कार करत तसेच भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले.
उद्घाटन सत्रात बोलताना बाबा आढाव म्हणाले “सध्याच्या काळात क्रांतीचा विचार पुढे नेणे फार गरजेचे आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन सध्याच्या परिस्थितीवर मात केली पाहिजे”
राष्ट्र सेवा दलाच्या नितीन वैद्य यांनी आम्ही भारताचे लोक या संकल्पनेवर भाष्य करत त्यातून देशाच्या केंद्रस्थानी जनता, लोक असण्याचे महत्व विशारद केले.
तर प्रसिद्ध अभिनेत्री रसिका अगासे म्हणाल्या “विविध कला महोत्सव होत असतात, संविधान महोत्सवही होत असतात. पण अशा प्रकारे जनसंस्कृती व संविधान यांचा मेळ घालणारा हा पहिलाच महोत्सव पाहण्यात आला असे निरिक्षण नोंदवले. तसेच कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत असताना प्रेक्षकांनी पण त्याविरुद्ध भक्कपणे उभे राहणे गरजेचे आहे असेही मत व्यक्त केले.
या जन सांस्कृतिक संविधान कला महोत्सवात विविध संस्कृतीचे दर्शन घडले.
यात मिलिंद सहस्रबुद्धे यांनी भिमवंदना, पुणे परिसरात शिकणाऱ्या विविध विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, अनिल सुडोलिकर यांनी सामूहिक रंगविष्कर, गाझी किंग यांनी सुफी गाणे, एम सी सोशलिस्ट यांनी सामजिक विषयावरील रॅप गीते, शितल भंडारे व प्रियंका खेडेकर यांनी हर दिल में संविधान, शितल यशोधरा यांनी मी भारताची संविधान प्रस्ताविका बोलतेय हा एकपात्री प्रयोग, पुणे मनपा युनियन यांनी कामगारांची गाणी, हृदयमानव अशोक व सहकाऱ्यांनी विलास घोगरे लिखित व्होरा नाट्य, श्रमिक हकक आंदोलन मधील सहकाऱ्यांनी बंजारा भजन व बंजारा नृत्य, केतकी यांनी कविता, न्यू स्टुडन्ट फेडरेशन यांनी नृत्य, शाहीर बापू पवार यांनी संविधानाचा गोंधळ, शाम सुंदर महाराज यांनी संविधान विषयावर कीर्तन, देवयानी यांनी मी सावित्री बोलतेय हा एकपात्री, एल आय सी युनियन यांनी चित्रपटांची गाणी सादर केली. निलेश पवार यांनी बंजारा दास्तान गोई हा प्रकार सादर केला. हृदयमानव अशोक यांनी काही विद्रोही कविता सादर केल्या. अर्चना मोरे यांनी संविधान प्रस्तविकेचे वाचन केले.

या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक वेस्टर्न झोनल इन्शुरन्स एम्प्लॉइज युनियन होती. तर त्याच्या आयोजनात श्रमिक हक्क आंदोलन, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, अन्नपूर्णा परिवार, भारत ज्ञान विज्ञान समुदाय, नव समाजवादी पर्याय, भीमशाही युवा संघ, संविधान संवाद समिती, कलास्नेह, कमायनॉरिटीज व्हॉइस, पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, नॅशनल अलायन्स फॉर पिपल्स मुवमेंट, समाज विज्ञान अकादमी, न्यु स्टुडंट्स ॲंड युथ फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, मिळून साऱ्याजणी, पुरुष उवाच, सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, पुणे जिल्हा (महाराष्ट्र), अखिल भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती संघटना, राष्ट्र सेवा दल, समाजवादी महिला सभा (महाराष्ट्र), लोकशाही उत्सव समिती, युक्रांद, विचार वेध, नवनिर्माण न्यास, दर्शन चलचित्र (डिजिटल प्लॅटफॉर्म), छात्र भारती, ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय, गांधी स्मारक निधी अशा विविध संघटना सहभागी होत्या.

महोत्सवाच्या आयोजनात महावीर जोंधळे, मुक्ता मनोहर, डॉ. प्रदीप आवटे, अक्षय शिंपी, डॉ. मुकुंद कुळे आदींनी विशेष आणि मोलाचं सहकार्य केलं
जन सांस्कृतिक चळवळीच्या दत्ता देसाई, गणेश विसपुते, मिलिंद चंपानेरकर, इंदूताई जोंधळे, नंदकिशोर जगडे, बी युवराज, इब्राहिम खान, सागर सविता धनराज, विनया मालती हरी, हृदयमानव अशोक, केशव वाघमारे आदींनी अधिक श्रम घेतले.

अतिशय उत्साहात महोत्सव पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता देसाई यांनी तर सूत्रसंचालन धनश्री व निहरिका भोसले यांनी केले. आभार बी युवराज यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading