Monday, June 1, 2026
BusinessLatest News

कोटक ब्लूचिप फंड साजरे करतोय  दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची 25 वर्षे

मुंबई  : कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडची (“KMAMC”/ “कोटक म्युच्युअल फंड”) प्रमुख योजना असलेला कोटक ब्लूचिप फंड हा गुंतवणुकीच्या गतिमान जगात वाढीचा दीपस्तंभ म्हणून उभा राहिला आहे. 29 डिसेंबर 1998 रोजी शुभारंभ झालेल्या या फंडाने नुकतेच 25 वर्ष अर्थात रौप्यमहोत्सवी कारकिर्दीचा  टप्पा पूर्ण केला आहे. हा फंड भारताच्या आर्थिक वाढीचे प्रतिबिंब असून एसआयपीद्वारे 16.36 टक्क्यांचा वार्षिक चक्रवाढ दर (CAGR) साध्य करत या फंडाने चक्रवाढ ताकदीचा उत्तम नमुना सादर केला आहे.

फंडाच्या कामगिरीचा अंदाज यावरून लावता येतो की, या फंडात 10,000 रुपयांचा  सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) द्वारे दरमहा गेले 25 वर्ष केलेल्या गुंतवणूकीचे अंदाजे मूल्य  31 जानेवारी 2024 अखेरीस 3.50 कोटी रुपये झाले आहे.

मजबूत व्यावसायिक मूलभूत तत्त्वांचे आचरण करणाऱ्या आणि सक्षम व्यवस्थापन या आधारे निवडलेल्या कंपन्यांमध्ये फंडाने गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे ब्लूचिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा फंड एक आदर्श पर्याय ठरला आहे. हीच पध्दत कोटकने आपल्या गुंतवणूक योजनांचा मुख्य भाग म्हणून विकसित केलेली आहे आणि त्याआधारे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन वाढ साध्य करण्यात मदत करत आहे.

कोटक ब्लूचिप फंडाने 2000 मध्ये डॉट-कॉमचा फुटलेला फुगा, 2008 चा जागतिक आर्थिक पेचप्रसंग, 2016 मधील नोटाबंदी आणि 2020 कोविड-19 महामारी यांसारख्या अनेक आर्थिक आणि जागतिक प्रसंग तोंड देत हे परतावे गुंतवणूकदारांना मिळवून दिलेले आहेत. अशा पेचप्रसंगातूनही पोर्टफोलिओची वाटचाल करणे ही फंडाच्या कामगिरीची गुरुकिल्ली आहे. जेव्हा निफ्टी फिफ्टी हा पायाभूत निर्देशांक 15 टक्के वर होता, तेव्हा फंडाने सुरुवातीपासून 18 टक्के दराने चक्रवाढ परतावा देत उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे.

केएमएएमसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा याप्रसंगी टिप्पणी करताना म्हणाले, “गेल्या 25 वर्षांमध्ये, भारतीय परिघ लक्षणीयरीत्या विकसित झालेला आहे. प्रत्येक आर्थिक चक्र, राजकीय चढउतार आणि मूलभूत बदलांमधून, कोटक ब्लूचिप फंडाने भारताच्या विकासकथेचे प्रतिबिंब प्रदर्शित केले आहे.”

केएमएएमसीच्या समभाग विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्षा उपाध्याय हे फंडाच्या निधीचे व्यवस्थापन सांभाळत असून त्यांनी फंडाचा निधी भारतातील ब्लू-चिप कंपन्यांमध्ये गुंतवत गुंतवणूकदारांना वाढीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. फंडाच्या सातत्यपूर्ण कामगिरीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. फंडाच्या रौप्यमहोत्सवी कामगिरीबद्दल बोलताना ते म्हणाले, “कोटक ब्लूचिप फंड गेल्या 25 वर्षांत विविध आर्थिक, राजकीय आणि सामाजिक बदलांना यशस्वीपणे सामोरे गेलेला आहे. फंडाने वेगवेगळ्या कालावधीत निफ्टी 100 आणि निफ्टी 50 या दोन्ही निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी बजावलेली आहे.”

सध्या हा फंड 31 जानेवारी 2024 अखेरीस 7,424.61 कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन सांभाळत असून यातूनच फंडाची क्षमता दिसून येते.

कोटक ब्लूचिप फंड हा केवळ भारतीय विकास कथेचा भाग नाही; तर या कथेचे एक महत्त्वपूर्ण  प्रकरण आहे. हा फंड म्हणजे वाढीच्या अथक प्रयत्नांची आणि अटळ लवचिकतेचे एक कथानकच आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading