पीएनबी हाउसिंग फायनान्सतर्फे मर्यादित काळासाठी ऑफर – ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या ठेवींवरील व्याजदर ८.३० टक्के
पुणे – पीएनबी हाउसिंग फायनान्स या भारतातील आघाडीच्या गृह वित्त कंपन्यांपैकी एका कंपनीने आज आपल्या नवीन ठेवींवर मर्यादित काळासाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. त्याअंतर्गत ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी प्रती वर्ष ८ टक्के व्याजदर, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी २३ महिने कालावधीसाठी ८.३० टक्के प्रती वर्ष व्याजदर लागू होणार आहे. हे खास व्याजदर ३१ मार्च २०२४ पर्यंत बुक केल्या जाणाऱ्या नवीन आणि रिन्यूवल निश्चित ठेवींवर लागू होणार आहेत. ही निश्चित ठेव किमान १० हजार रुपयांची असणे आवश्यक असून त्यामुळे गुंतवणुकदारांना संपत्ती विकासाचा सुरक्षित मार्ग मिळणार आहे.
पीएनबी हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीश कौसगी म्हणाले, ‘निश्चित ठेवी, आर्थिक गुंतवणुकीचा प्रवास सुरू करत असलेल्यांसाठी योग्य आहेतच, शिवाय ज्यांना कमी किंवा साधारण जोखीम घ्यायची आहे, त्यांच्यासाठीही योग्य आहे. गुंतवणुकदारांना गुंतवणुकीची नियमित सवय लागावी यासाठी निश्चित ठेवींवर मर्यादित काळाची ऑफर जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत व नाविन्यपूर्ण आर्थिक सेवा देण्यासाठी तसेच भविष्यासाठी बचत करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’
पीएनबी हाउसिंग फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी ठेवीधारक गृह वित्त कंपनी आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या एकूण सार्वजनिक ठेवी १७,१३४ कोटी रुपयांवर गेल्या आहेत. कंपनीच्या ठेवींना क्रिसिल ‘एए/पॉझिटिव्ह’ आणि केअर ‘एए/पॉझिटिव्ह’ रेटिंग देण्यात आले असून त्यावरून ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दिसून येतो. कंपनीद्वारे १८ हजारपेक्षा जास्त चॅनेल भागिदारांच्या दमदार वितरण नेटवर्कद्वारे निश्चित ठेवी, डिजिटल क्षमता व दर्जेदार सेवेसाठी खास ग्राहक सेवा अधिकारी सुविधा दिली जाते.
