बीएमडब्ल्यू तर्फे मुंबईमध्ये जॉयटाऊन दुसरे पर्व सादर.
पुणे : बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया म्युझिक व ड्रायव्हिंग फेस्टिवल जॉयटाऊन चे दुसरे पर्व सादर करत आहे. सर्वोत्तम ब्रॅण्ड अनुभव देणारे दोन-दिवसीय फेस्टिवल मुंबईतील ब्रॅण्ड चाहते व उत्साहींना महालक्ष्मी रेसकोर्स, मुंबई येथे १२-१३एप्रिल २०२४ रोजी मंत्रमुग्ध करणार आहे .
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्य्क्ष श्री. विक्रम पावाह म्हणाले की अधिक उत्साहासह आम्ही मुंबईमध्ये नाविन्यपूर्ण फेस्टिवल जॉयटाऊन चे दुसरे पर्व घेऊन येत आहोत, जेथे ड्रायव्हिंग रोमांचसह मधुरमय संगीतचा आनंद मिळेल. जॉयटाऊन सेलिब्रेशन आहे, ज्यामधून बीएमडब्ल्यू, मिनी आणि बीएमडब्ल्यू मोटोर्राडची तत्त्वे दिसून येतात, ज्यामध्ये आमच्या अग्रणी ऑटोमोटिव्ह सुधारणा पाहायला मिळण्यासह सुप्रसिद्ध संगीतकारांच्या उत्साहवर्धक संगीताचा आनंद मिळतो. आम्ही जॉयटाऊन येथे संस्मरणीय प्रवासाची खात्री देतो, जेथे सर्वोत्तम इंजीनिअरिंग उत्कट आवडीची पूर्तता करते आणि प्रत्येक रस्त्यावर अपवादात्मक व संस्मरणीय अनुभव मिळतो.
भव्य लाइव्ह परफॉर्मन्स सादर करणारा मुख्य मंच संस्मरणीय संध्याकार्यक्रमाचा आनंद देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जागतिक सेन्सेशन्सची लाइन-अप जसे द चेनस्मोकर्स सोबत पॉवरहाऊस परफॉर्मर्न्स जसे दिलजीत दोसांझ उत्साहपूर्ण व वैविध्यपूर्ण संगीतचा आनंद देतील. अनेक प्रख्यात कलाकार व बॅण्ड्स इंडी, पॉप व इलेक्ट्रॉनिक म्युझिक अशा संगीतमय शैलींच्या संपन्न टेपेस्ट्रीसह मंत्रमुग्ध करतील, जे ऑडिओफाइल्स आणि संगीतप्रेमींचे लक्ष वेधून घेतील.
या कार्यक्रमामध्ये बुक माय शॉ लाईव्ह द्वारे लाइव्ह एंटरटेनमेंट एक्सपेरिअन्मेंट डिव्हिजनद्वारे कलाकारांची शानदार लाइनअप तयार केली गेली आहे. सदरील शानदार कार्यक्रम अनुभवण्यासाठी जॉयटाऊन ची एंट्री तिकिटे बुक माय शॉ वर उपलब्ध आहे. ह्या तिकिटांची अर्ली बर्डस साठी सुरुवात रु
३९९९ पासून सुरु होत आहे. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हा विनामूल्य प्रवेश आहे . तिकीट बुकिंग साठी https://in.bookmyshow.com/mumbai/events/bmw-joytown-2024/ET00386991
या संकेतस्थळाला भेट द्या.
