fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

मुंबई :आघाडीची स्थावर मालमत्ता विकासक कंपनी आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे.

कंपनीच्या आयपीओमध्ये ४३० कोटी रुपयांच्या फ्रेश इश्यूचा (नव्याने जारी करण्यात आलेले इक्विटी समभाग) समावेश आहे.

आयपीओमधून उभारले जाणार असलेले भांडवल त्यांच्या सध्या सुरु असलेल्या (जसे की, आर्केड नेस्ट) आणि आगामी प्रकल्पांसाठी, तसेच भविष्यातील स्थावर मालमत्ता प्रकल्पांच्या अधिग्रहणासाठी व सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरण्याची कंपनीची योजना आहे.

आर्केड डेव्हलपर्स या वेगाने विकसित होत असलेल्या स्थावर मालमत्ता विकास कंपनीने महाराष्ट्रात, मुंबईमध्ये स्वतःचे लक्षणीय स्थान निर्माण केले आहे.  भारताची व्यापारी राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात प्रीमियम महत्त्वाकांक्षी जीवनशैलीचा अनुभव देणाऱ्या घरांच्या विकासावर कंपनीने आपले लक्ष केंद्रित केले आहे. ३१ जुलै २०२३ च्या आकडेवारीनुसार, या कंपनीने १.८० मिलियन चौरस फीट निवासी संपत्तीचा विकास केला आहे (यामध्ये भागीदारी कंपन्यांमार्फत विकसित केल्या गेलेल्या संपत्तींचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये आर्केडची हिस्सेदारी सर्वात जास्त आहे). नवीन प्रकल्प आणि आधीच्या घरांच्या पुनर्विकासामध्ये कंपनी कार्यरत असून, २०१७ आणि २०२३ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान त्यांनी १०४० घरे लॉन्च केली आणि बृहन्मुंबई महानगर क्षेत्रात विविध बाजारपेठांमध्ये ७९२ घरे विकली. आपले प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा या कंपनीचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि २००३ ते मार्च २०२३ दरम्यान त्यांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये ९ आणि दक्षिण-मध्य मुंबईमध्ये एका प्रकल्पाचा पुनर्विकास यशस्वीपणे पूर्ण केला आहे (एका भागीदारी कंपनीमार्फत, ज्यामध्ये आर्केडची हिस्सेदारी सर्वाधिक आहे) या प्रकल्पांचे एकूण बांधकाम करण्यात आलेले क्षेत्रफळ ६,४८,००० चौरस फीट आहे.  या ट्रॅक रेकॉर्डमुळे आर्केड ही मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील पुनर्विकासातील एक प्रमुख कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. (स्रोत: ऍनारॉक रिपोर्ट)

कंपनीचे सुरुवातीचे प्रकल्प स्टॅन्ड-अलोन निवासी इमारतींचे होते पण त्यांच्या सध्याच्या काम सुरु असलेल्या प्रकल्पांमध्ये आर्केड नेस्ट, आर्केड क्राऊन, आर्केड अस्पायर, आर्केड प्राईम आणि आर्केड ऑरा यासारख्या गेटेड कम्युनिटीजचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०२३, २०२२ आणि २०२१ मध्ये आर्केड डेव्हलपरचा महसूल अनुक्रमे २२४०.१३ मिलियन रुपये, २३७१.८२ मिलियन रुपये आणि ११३१.८५ मिलियन रुपये होता. आर्थिक वर्ष २०२१ ते २०२३ दरम्यान कंपनीचा सीएजीआर २६.६९% नी वाढला आहे. त्यांचे सर्व प्रकल्प महाराष्ट्रात बृहन्मुंबई महानगर क्षेत्रात आहेत.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) युनिस्टोन कॅपिटल आहेत. या कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई व एनएसईमध्ये सूचिबद्ध करण्यात येतील.

डीआरएचपी लिंक: https://arkade.in/wp-content/uploads/2023/09/Arkade-Developers-Draft-Red-Herring-Prospectus.pdf

Leave a Reply

%d