fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

एएससीआय अकॅडमी स्थापन करण्यासाठी अनेक संबंधित संघटना एकत्र आल्या  

पुणेजाहिरात क्षेत्राची अधिक जबाबदार आणि पुरोगामी जाहिराती बनविण्याची क्षमता द्विगुणीत करण्याच्या हेतूने हाती घेण्यात आलेला प्रवर्तनात्मक उपक्रम म्हणून एएससीआय अकॅडमीच्या उद्घाटनाची घोषणा अॅडव्हर्टाइझिंग स्टॅण्डर्डस् काउन्सिल ऑफ इंडिया (एएससीआयने मोठ्या अभिमानाने केली आहे. जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील अनिष्ट गोष्टींत सुधारणा सुचविण्याच्या बाबतीत एएससीआयने आपली भूमिका आधीच प्रस्थापित केली आहे. याच भूमिकेला आधारभूत मानून उभारण्यात आलेल्या या प्रवर्तनात्मक मंचाद्वारे जाहिरातीची संकल्पना मांडली जाण्याच्या टप्प्यापासूनच स्वयं-नियमन अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अगदी त्रोटक काळासाठी चालणाऱ्या जाहिराती आणि जाहिरातदारांच्या संख्येने घेतलेली जोरदार उसळी ही व्यवच्छेदक लक्षणे असलेल्या आजच्या डिजिटल भूदृश्यामध्ये इन्फ्लुएन्सर्स आणि विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील विद्यमान आणि भावी व्यावसायिकांना जाहिरातीसाठीच्या नियमनांचे पायाभूत ज्ञान देत व सुरुवातीच्या टप्प्यापासूनच नैतिक कार्यपद्धतींचा वापर होईल याची खबरदारी घेत या व्यावसायिकांना सक्षम बनविण्याचे काम एएससीआयने हाती घेतले आहे. 

जाहिरातनिर्मितीच्या प्रक्रियेत उत्तरदायीत्त्वाचा मुद्दा उचलून धरण्यासाठी आणि अंतिमतग्राहकांचा ब्रॅण्ड्सवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या जाहिरातकर्मींचा एक गट बनविणे हे एएससीआय अकॅडमीचे मूळ ध्येय आहे. 

ही अकॅडमी एएससीआयकडे सर्वात आधीपासून असलेले विपुल विचारधन आणि शैक्षणिक कार्यक्रम यांचे एका छताखाली धोरणशीर पद्धतीने एकत्रिकरण करते. अकॅडमीद्वारे चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा विस्तृत पट ऑनलाइनइन-पर्सन आणि हायब्रिड अशा प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या माध्यमांच्या गरजा भागविणारा आहे. ई-लर्निंग मॉड्युल्सपासून ते विशिष्ट विषयांना वाहिलेल्या वेबिनार्सपर्यंतनियामक अटीशर्थींच्या बारकाव्यांचा तपशीलवार वेध घेणाऱ्या मास्टरक्लासेसपासून ते विद्याशाखा विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून अध्यापन कौशल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट या अकॅडमीमध्ये असणार आहे. इतकेच नव्हे तर इथे राबविण्यात येणाऱ्या इन्फ्लुएन्सर सर्टिफिकेशन कार्यक्रमांमुळे कोणत्याही उत्पादनाची एन्डॉर्समेन्ट वा प्रसिद्धी जबाबदारीने केली जावी याची खबरदारी घेतली जाईल तर ग्राहक प्रशिक्षण उपक्रमांतून संपूर्ण माहितीनिशी उत्पादन वा सेवा निवडण्याच्या सवयीची जोपासना केली जाईल. सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि संशोधनासाठी केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून जाहिरातींशी संबंधित सर्व घटकांना स्वयं-नियमनाच्या प्रतिबंधात्मक बाजूमध्ये सामावून घेण्याप्रती असलेली आपली बांधिलकी एएससीआय अकॅडमीकडून खंबीरपणे निभावली जात आहे. जाहिरातनिर्मितीच्या जबाबदार पद्धतींमध्ये असलेल्या सामायिक विश्वासाने एकजूट झालेल्या सर्व संबंधित घटकांना एएससीआय अकॅडमी एकत्र आणत आहे. सिप्ला हेल्थ लिमिटेडकोका-कोला इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकोलगेट पाल्मोलिव्ह (इंडिया) लिमिटेडदिआजिओ इंडियाहिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमॉन्डेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडनेस्ले इंडिया लिमिटेडपेप्लिको इंडिया होल्डिंग्ज प्रा. लि.प्रॉक्टर अँड गॅम्बल होम प्रोडक्ट्स प्रयाव्हेट लिमिटेडअनेक अग्रगण्य विद्यापीठे आणि महाविद्यालयेमुंबई ग्राहक पंचायतकन्झुमर व्हॉइस, CUTS, CMS आणि अशा अनेक नागरिक संघटना व ISA, AAAI, IAA आणि ISWAI  यांसारख्या औद्योगिक संस्था तसेच संशोधन संस्थांसह ५०हून अधिक संस्थापक भागीदार आणि पाठीराखे अकॅडमीला लाभले आहेत. 

ग्राहक व्यवहार विभागचे सचिव रोहित कुमार सिंग म्हणाले, “एएससीआय अकॅडमीच्या उद्घाटनाबद्दल मी एएससीआयचे अभिनंदन करतो. डिजिटल युगामध्ये प्रतिबंधात्मक कृतींना अत्यंत महत्त्व आणि भरपूर प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि या उद्योगक्षेत्रातील विद्यमान व भावी व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे हा या यंत्रणेतील एक महत्वाचा हस्तक्षेप आहे. जाहिरातींच्या स्वयं-नियमनासाठी कार्यरत संस्थेद्वारे जाहिरात उद्योगक्षेत्रामध्ये जबाबदार कार्यसंस्कृती जोपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या अशा प्रयत्नांना ग्राहक व्यवहार विभागाचा पाठिंबा राहील. जाहिरात उद्योग आपल्या टीम्सना अधिक प्रशिक्षित आणि जाहिरात नियमनांच्या बाबतीत अधिक शिक्षित बनविण्यासाठी अकॅडमीच्या कार्यक्रमांमध्ये सखोलपणे सहभागी होईल, अशी आशा आहे.

एएससीआय अकॅडमीच्या अपेक्स काउन्सिलचा भाग असणारे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सह-सचिव  विक्रम सहाय म्हणाले, “एएससीआय अकॅडमीच्या उद्घाटनासाठी एएससीआयचे अभिनंदन. माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे माध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील स्वयं-नियमन यंत्रणांना कायमच पाठिंबा देत आले आहे. अकॅडमीकडून पुरविली जाणारी संसाधने आणि पाठबळ ऑनलाइन जाहिरातदार व मंचांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेलअशी आमची आशा आहे.

उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना एएससीआयचे चेअरमन एनएस राजन म्हणाले, “एएससीआयकडे चुका दुरुस्त करण्यासाठीची भक्कम यंत्रणा आधीपासूनच होतीपण त्याचबरोबर सर्जनशीलता आणि जबाबदारी यांच्यातील गतीशील परस्परनात्यामध्ये मेळ साधण्याची आणि एकूणच समाजावर जाहिरातींच्या होणाऱ्या व्यापक परिणामांचा विषय चर्चेत आणण्याचीही आमची इच्छा होती. एएससीआय अकॅडमी म्हणजे या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहेज्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुकर होईल आणि उद्योगक्षेत्राने जाहिराती बनविण्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब करावा यासाठी मदत करणारी जाहिरात परिसंस्था आकारास येईल.

एएससीआयच्या सीईओ आणि सेक्रेटरी जनरल मनिषा कपूर पुढे म्हणाल्या, “छोट्या कालावधीच्या जाहिराती बनविल्या जात असताना या जाहिराती प्रसारित झाल्यावरच नव्हे तर त्या बनत असतानाच्या टप्प्यावरच लक्ष देणे महत्त्वाचे झाले आहे. जेव्हा बाजारात येणारी प्रत्येक जाहिरात ही जबाबदार आणि नियमांचे पालन करणारी असेल तेव्हा ही स्थिती ग्राहक आणि उद्योगक्षेत्र या दोहोंच्याही फायद्याची असेल. येत्या तीन वर्षांमध्ये संशोधनासाठीचे कार्यक्रम आणि ग्राहक प्रशिक्षणाबरोबरच १००,००० विद्यमान आणि भावी उद्योजकांना स्वयंअध्ययन आणि ऑन-कॅम्पस् कार्यशाळा व सत्रांच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचे एएससीआय अकॅडमीचे लक्ष्य आहे. भारतात स्वयं-नियमनपद्धतीचा हा एक नवा अध्याय सुरू झाला आहे आणि आमच्या या ध्येयाला पाठबळ दिल्याबद्दल आम्ही आमच्या सर्व संस्थापक सहकाऱ्यांप्रती कृतज्ञ आहोत. आमच्या या कामामध्ये विश्वास ठेवणारे आणखीही अनेकजण आम्हाला सामील होतीलअशी आमची आशा आहे. ही तर केवळ सुरुवात आहे.

Leave a Reply

%d