‘वसा शिक्षणाचा आशिर्वाद बाप्पाचा’ उपक्रमांतर्गत वंचितांना शालेय साहित्य
पुणे : तरुण पिढीमधील समाजाला मदत देण्याचा दृष्टीकोन जागा करण्याकरिता पुढाकार घेत, वसा शिक्षणाचा आशिर्वाद बाप्पाचा उपक्रमांतर्गत गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाने १०० अनाथ मुलांना दत्तक घेऊन वर्षभर त्यांच्या शालेय खर्चाची जबाबदारी घेतली आहे. फुरसुंगीतील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अनाथ आश्रमातील मुलांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप करीत मुलांच्या चेह-यावर आनंदाचे आणि समाधानाचे हास्य गणेशोत्सव मंडळाने फुलविले.
कार्यक्रमाला पुणे शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सामाजिक कार्यकर्ते व रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, रा.स्व.संघ समरसता गतिविधी संयोजक शरद शिंदे, मंडळाचे कार्यकर्ते केतन भागवत,रोहित शिंदे, अथर्व इंदलकर, सुमित काची, सचिन चौधरी, गौरव मळेकर, रमेश चोरघे, विजय दवे, मनीष शिंदे, सचिन शिंदे, हरीश मेमाणे, संजय शिंदे, संतोष शिंदे, रोहन शिंदे, नयन मेश्राम, प्रथमेश भागवत, वेदांत चौधरी, तन्मय पारेकर, बंटी पंदारे उपस्थित होते. उपक्रमाचे चौथे वर्ष आहे.
सतिश गोवेकर म्हणाले, उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिल्याचे उत्तम उदाहरण मंडळाने समाजापुढे ठेवले आहे. मंडळाने यावर्षी देखील ही मदतीची परंपरा कायम ठेवली आहे. दरवर्षी १०० अनाथ मुलांना दत्तक घेऊन वर्षभर त्यांच्या शालेय खर्चाची जबाबदारी मंडळ घेत असते, त्यामुळे यामाध्यमातून तरुण पिढीमधील मदतीचा दृष्टीकोन जागा करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
राम बांगड म्हणाले, समाजासाठी काहीतरी करायचे हा विचार प्रत्येकामध्ये रुजायला हवा. मन स्वच्छ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर आपल्या हातून सामाजिक कार्य घडते. गणेशोत्सव मंडळे सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करीत असून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु करण्यामागचा उद््देश पूर्ण होताना दिसत आहे.