Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा-मंत्री अतुल सावे

 

पुणे : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर सयंत्र प्राधान्याने पूर्ण करावे तसेच प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तर दायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) नियामक मंडळाची १०८ वी तसेच ३१ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पुणे येथील महाऊर्जा भवन येते पार पडली. यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महाऊर्जा महासंचालक ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर व सर्व विभागांचे महाव्यवस्थापक , उपसंचालक लेखा व इतर अधिकारी उपस्थित होते.

श्री. सावे यांनी पीएम कुसुम योजनेमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉल सेंटर सुरू करावे. सध्याच्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी विभागाच्या सर्व इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची सूचना दिल्या.

यावेळी महाऊर्जा कार्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या प्रकल्प अधिकारी व लेखापाल यांना मंत्री श्री. सावे व श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading