माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या राज्यव्यापी रक्तदान मोहीमेस अभूतपूर्व यश
पुणे : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आणि माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळच्या माजी विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी रक्तदान मोहीम हाती घेतली होती. यामध्ये राज्यभरातून तब्बल ४८१२ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. पुण्यातून सर्वाधिक १५३७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
पुणे, सोलापूर, जळगाव, इचलकंरजी, लातूर, मालेगाव, अहमदनगर, नाशिक, मुलुंडच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी शिबिरे आयोजित केली तसेच नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष कीर्ती लढ्ढा व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. रक्तदात्यांना डिजिटल सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे ही संस्था गेली ९४ वर्ष कार्यरत असून त्यांचे हजारो विद्यार्थी राज्यभरात यशस्वी वाटचाल करत आहेत. यातील माजी विद्यार्थी सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. संस्थेच्या लाहोटी हाॅस्टेलच्या संस्थापन दिनाच्या निमित्ताने यावर्षी विद्यार्थ्यांनी राज्यभर रक्तदान मोहीम राबवण्याचे ठरवले.
पुण्यातील लाहोटी वसतिगृह मॉडेल कॉलनी, लक्ष्मी वसतीगृह मुकुंद नगर, बाणेर वसतीगृह, महेश विद्यालय कोथरूड, खंडेराय मंगल कार्यालय आकुर्डी, कस्तुरी थाळी वाघोली आदी ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले.