दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे यांची फेरनिवड
पुणे : दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची वर्ष २०२३-२०२४ साठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्याची सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी बँकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे तर उपाध्यक्षपदी श्रेयश रुकारी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. अॅड अशोक एन धानापुरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य व अधिकारी वर्ग या वेळी उपस्थित होते.
अनिल गाडवे हे पुण्यातील प्रसिद्ध काका हलवाई या फर्मचे भागीदार असून श्रेयश रुकारी हे वास्तुविशारद आहेत.
याप्रसंगी बोलताना अनिल गाडवे म्हणाले, “आज अखेर बँकेचा एकूण व्यवसाय हा रु ३०३५ कोटी असून तो रुपये ५००० कोटी करण्याचा आमचा निर्धार आहे. तसेच बँकेच्या इचलकरंजी व लातूर शाखा पुढील महिन्यात सुरु होतील. ग्राहकांना डिजिटल सुविधा अधिकाधिक उपलब्ध करून देण्याचा बँक सतत प्रयत्न करीत आहे.”
