fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

शादी डॉट कॉम ने सुरू केले पुण्यात कार्यालय

पुणे: शादी डॉट कॉम या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या मॅचमेकिंग (लग्ने जुळवणाऱ्या) प्लॅटफॉर्मने ऑगस्ट २०२३ मध्ये पुण्यात नवीन कार्यालय स्थापन केल्याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण संपादनामुळे कंपनीसाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. देशभरातील व्यापक अस्तित्वासाठी पार्श्वभूमी तयार झाली आहे. महाराष्ट्र ही शादी डॉट कॉम साठी महत्त्वपूर्ण बाजारपेठांपैकी एक असल्यामुळे पुण्यात कार्यालय सुरू केल्याने कंपनीचे राज्यातील स्थान भक्कम होणार आहे. नवीन कार्यालय मेरिडिअन प्लाझाजवळ असून, शहरात मध्यवर्ती असलेल्या सेनापती बापट मार्गावर आहे. चतु:श्रृंगी मंदिराजवळ असल्यामुळे हा भाग शहराचे सांस्कृतिक केंद्रही आहे. नवीन कार्यालय सुमारे ५००० चौरस फूट जागेत पसरलेले आहे आणि ७०हून अधिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित विक्री टीमला सामावून घेण्यास सज्ज आहे. एक विशेष अभिव्यक्ती म्हणून, हे कार्यालय, कंपनीच्या सर्वोच्च रेटिंग असलेल्या सल्लागारांशी आपल्या संभाव्य लग्नविषयक गरजांबाबत चर्चा करण्याचे आमंत्रण कंपनी लग्नास उत्सुक व्यक्तींना देत आहे.

पीपल ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम मित्तल या विस्ताराबद्दल म्हणाले,  “पुणे येथे कार्यालय सुरू करून, पश्चिम विभागातील स्थान अधिक पक्के करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. ही वाढती बाजारपेठ आहे आणि यात अत्यंत प्रतिभावंत तरुणांचा समावेश आहे. कामाचे वातावरण समावेशक राखण्याची काळजी घेऊन आमच्या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्षमता तर वाढेलच, शिवाय आमच्या नव्याने समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना सकारात्मक वातावरण देण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठीही मदत होईल.”

शादी डॉट कॉम च्या या धोरणात्मक कृतीमुळे भारतातील विविध शहरांमध्ये व्याप्ती विस्तारण्याप्रती बांधिलकी अधोरेखित झाली आहे. ग्राहकांच्या समाधानावर सातत्याने लक्ष केंद्रित करून तसेच प्रगतीशील व्यावसायिक उद्दिष्टांशी संलग्नता राखून, देशातील आपल्या वाढत्या ग्राहकांना सेवा देण्याचे उद्दिष्ट शादी डॉट कॉम पुढे आहे. या विस्तार उपक्रमामुळे ग्राहकांच्या बदलत्या आवश्यकता प्रभावीरित्या पूर्ण केल्या जातील तसेच विस्तृत व्यवसाय उपक्रमांमध्ये अधिकाधिक सुधारणा होईल. मुंबई (अंधेरी), चेन्नई, कोलकाता आणि आता पुण्यात अलीकडेच कार्यालये सुरू केल्यानंतर आता दक्षिण भारतातील बाजारपेठेत विस्तार करण्याचीही कंपनीची योजना आहे. हैदराबाद व कोइंबतूर येथे कार्यालये उघडण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत शादी डॉट कॉम च्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे.

या नवीन आस्थापनांमुळे आम्हाला अधिक विस्ताराची क्षमता प्राप्त होईल तसेच आमच्या मौल्यवान ग्राहकांना कार्यक्षम सेवा देता येईल, त्यामुळे आमचे प्रादेशिक स्थान अधिक व्यापक होईल, असा ठाम विश्वास आम्हाला वाटतो.

Leave a Reply

%d