किटो मोटर्स आणि सेरा इलेक्ट्रिक एकत्र येऊन भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन कंपनी बनणार
हैद्राबाद : किटो मोटर्स आणि सेरा इलेक्ट्रिक – इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील एक महत्वाची भागीदारी ठरणार असून; एकत्रितपणे सेरा किटो प्रा. लिमिटेड नावाने आपली नवीन ओळख निर्माण करणार आहे. या भागीदारीमुळे भारतीय इलेक्ट्रिक 3-चाकी (ई3डबल्यू) क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावली जाणार असून, देशाच्या टिकाऊ परिवहन उद्देश्यामध्ये मोठा हातभार लावला जाणार आहे.
“सेरा किटो”नावाचा ब्रॅन्ड E3W साठी एक प्रेरणा ठरणार असून चालक आणि प्रवाशांकरिता एक उत्तम डिझाईन आणि आत्याधुनिक वैशिष्ठ्यांसह, जलद चार्ज तंत्रज्ञान, वाहन नियंत्रण युनिट (व्हीसीयु) आणि सर्वोतोपरी सुरक्षा आणि आरामाचे फ़ायदे प्रदान करणारा ठरणार आहे.
सेरा इलेक्ट्रिकचे L 3 श्रेणीच्या इलेक्ट्रिक 3 चाकी (ई-रिक्षा) वाहनांच्या निर्मीतीमध्ये एक महत्वाचे स्थान आहे, चलनामध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडत असतानाच टिकाऊ अशा उपाय योजना देण्यात देखील त्यांना यश आले आहे. किटो मोटर्स आपल्या चोख डिझाईन आणि L5 श्रेणीच्या इलेक्ट्रिक 3-चाकी (ई-ऑटो) प्रवासी आणि कार्गो वाहनांच्या निर्मीतीकरिता प्रसिद्ध आहे.
सेरा इलेक्ट्रिकची डिझायनिंग, उत्पादकता आणि L3(इलेक्ट्रिक थ्री व्हिलर (ई-रिक्षा) वाहनांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीच्या उत्तमतेसह किटो मोटर्सच्या प्रवासी आणि कार्गो L5 (इलेक्ट्रिक थ्री व्हिलर (ई-ऑटो) वाहनांच्या डिझायनिंग आणि उत्पादकतेची उत्तमता एकत्र येण्याने ईव्ही बाजारपेठेमध्ये एका चांगल्या प्रभावासह भक्कम असा ठसा उमटविला जाणार आहे.
सेरा किटो ईव्ही प्रा. लिमिटेडच्या धोरणात्मक ब्लुप्रिंटनुसार सुरवातीच्या काळामध्ये शंभर डिलर्सच्या मदतीने भारतभरात प्रसार करण्याचा विचार असून वर्षभरातच ही डिलर्सची संख्या 250 पर्यंत नेण्याचे देखील ठरविले गेले आहे. या प्रसाराच्या धोरणामुळे L5 इलेक्ट्रिक ऑटो महत्वाच्या मेट्रो तसेच, टियर 2 आणि टियर 3 शहरांपर्यंत देखील पोहोचतील. या भागीदारीच्या माध्यमाने भारताच्या उत्सर्जनामध्ये घट आणण्याच्या उद्दिष्टास सहाय्य केले जाणार असून 2030 पर्यंत 80% 3-चाकी आणि 2-चाकी वाहने देशात ई-वाहने असतील ही मोहिम देखील राबविली जाईल.
सेरा इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि संचालक, नितिन कपूर हे या भागीदारीबद्दल आनंद आणि उत्साह व्यक्त करताना म्हणाले, की भारताच्या ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेत याभागीदारीच्या माध्यमाने पर्यावरण पूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानानी युक्त अशी उत्पादने देण्यास आम्ही बांधिल आहोत.
सेरा किटोच्या उत्पादनांमध्ये उच्च गतीची इलेक्ट्रिक प्रवासी तसेच कार्गो वाहने असतील, ज्यामुळे लोकांना आधुनिक आणि परिणामकारक अशी परिवहन उत्पादने मिळतील याची आम्हाला खात्री आहे.
तेलंगाना आणि हरियाणा येथील आपल्या उत्पादन सुविधांमध्ये अत्याधुनिक पद्धतीने बनविलेल्या या E3W वाहनांची किंमत ही परवडणारी असेल आणि या भागीदारी अंतर्गत येत्या सहा महिन्यांमध्ये सहा नवीन उत्पादने आणण्याचा आमचा मानस आहे.
किटो मोटर्सचे संस्थापक असलेले, डॉ. कार्थिक पोनापुला , भागीदारीवर बोलताना म्हणाले, “जेव्ही आपली सर्वात मोठी E3Wची बाजारातील वाहन श्रेणी, नव्या उत्पादनांच्या माध्यमाने व्यापकपद्धतीने सादर करणार असून, येणाऱ्या काही तिमाहींमध्ये बाजारातील उदयास येणाऱ्या विभागांना त्याचा नक्कीच लाभ होईल. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या उत्पादनांमध्ये ईटीओ फ़्लीट व्यवस्थापन उत्तमता आणि ईव्ही चार्जिंगच्या ट्रिनिटी क्लिनटेक इन्सटॉलेशनचा देखील समावेश केला गेला असून, ही वाहने ईव्ही इकोसिस्टीममध्ये उतरण्यास अगदी तयार आहेत.”
सेरा किटोच्या जेव्ही प्रवासामधील हा विकास, “इलेक्ट्रिक गतीशीलतेला एक सर्व्हिस” म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा ठरेल. यामुळे भारताच्या पहिल्या आणि अंतिम अशा विद्युतीकरणाच्या ध्येयाची पूर्तता करण्यास हातभार लागणार असून देशाच्या टिकाऊ अशा परिवहन उपाययोजनेच्या दृष्टीने वाटचाल केली जाणार आहे.