fbpx
Saturday, September 30, 2023
BusinessLatest News

‘एंटरप्राइझ नेटवर्किंग सोल्यूशन्स’ क्षेत्रात ‘वनओटीटी इंटरटेन्मेंट’तर्फे ‘सेलेरिटीएक्स’ ब्रँड सादर

मुंबई : ‘हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स’ची (एचजीएस) ब्रॉडबँड उपकंपनी असलेली ‘वनओटीटी इंटरटेन्मेंट लि.’ (ओआयएल) भारतातील वेगाने वाढणाऱ्या ‘एंटरप्राइझ सोल्यूशन्स’ क्षेत्रात प्रवेश करीत आहे. आपल्या ‘बी-टू-सी’ व्यवसायात मिळवलेले तंत्रज्ञानातील कौशल्य आणि डोमेन ज्ञान यांचा उपयोग या नव्या उद्योगात करण्याचा या कंपनीचा मानस आहे. ‘ओआयएल’ ही भारतातील चौथी सर्वात मोठी खासगी इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनी आहे.

‘सेलेरिटीएक्स’ हा या कंपनीचा नवीन ब्रॅंड आहे. कोणत्याही आकाराच्या किंवा क्षमतेच्या एंटरप्राइझ ग्राहकांना हव्या तशा डिजिटल सोल्यूशन्सचा पोर्टफोलिओ या ब्रॅंडतर्फे पुरविण्यात येणार आहे.

“सेलेरिटी” म्हणजे अतिजलद वेग; तर एक्स हा शब्द प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञान सूचित करतो. या दोन शब्दांचा मिळून “सेलेरिटीएक्स” हा शब्द बनविण्यात आला आहे. वेगाने, चपळतेने उपलब्ध होणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान असा “सेलेरिटीएक्स” या ब्रॅंडच्या नावाचा अर्थ आहे.

केवळ दोन-चार क्लिक्स करून नेटवर्किंग उपलब्ध करण्याइतका सोपेपणा ‘सेलेरिटीएक्स’मध्ये असणार आहे. व्यापक स्वरुपाची एंटरप्राइज सोल्यूशन्स या ब्रॅंडमधून पुरविण्यात येतील. यांमध्ये, ऑन-प्रिमाइसेस, क्लाउड आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी वातावरणात अत्याधुनिक स्वरुपाचे ब्रॉडबॅंड ओव्हर सॅटेलाईट (बीओएस), फायबर, आणि फाईव्ह-जी मेश नेटवर्क, त्याचप्रमाणे झीरो-टच डिजिटली एनेबल्ड इंडस्ट्री सोल्यूशन्स यांचा यांमध्ये समावेश असेल. एंटरप्राइझचा आकार आणि कामकाजाचे प्रमाण कितीही असले, तरी ‘सेलेरिटीएक्स सोल्यूशन्स’मुळे या व्यवसायांना कार्यक्षमता आणि कामगिरी यांची नवीन उंची गाठता येईल. त्यांची उत्पादकता आणि अपटाइम यांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन खर्चात निश्चित स्वरुपाची घट साधता येईल.

या प्रसंगी बोलताना, ‘एचजीएस’चे पूर्णवेळ संचालक आणि डिजिटल मीडिया व्यवसायाचे प्रमुख विन्सली फर्नांडीस म्हणाले, “सेलेरिटीएक्स’ची व्यावसायिक जगाशी ओळख करून देताना आम्हाला आनंद होत आहे. नेटवर्कचा वेग, त्याचे कार्यप्रदर्शन आणि विश्वासार्हता यांची मागणी करणाऱ्या उद्योगांसाठी नेटवर्किंग जलद व सोपे बनवण्याच्या आमच्या मूल्य प्रस्तावाला पुढे नेणारा हा ब्रॅंड आहे. ‘नेक्स्टडिजिटल’ आणि ‘ओआयएल’च्या संपूर्ण भारतातील पायाभूत सुविधा, फूटप्रिंट आणि नेटवर्क यांचा लाभ सेलेरिटीएक्स ब्रॅंडला होईल, तसेच आपल्या मालमत्तांमधून कमाई करू इच्छिणाऱ्या अनेक भागीदारांचाही फायदा होईल.”

‘ओआयएल’चे चीफ बिझनेस ऑफिसर आणि ‘सेलेरिटीएक्स’चे बिझनेस हेड समीर कणसे म्हणाले, “एंटरप्राइझ सोल्युशन्समधील व्यावसायिक या नात्याने, ग्राहकांना नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स व उत्कृष्ट अनुभव देण्यास सेलेरिटीएक्स हा ब्रॅंड कटिबद्ध आहे. ‘सेलेरिटीएक्स’मुळे जटिलता आणि सोपेपणा यांचा संयोग साधला जाऊन एंटरप्राइझ व्यावसायिकांना यशस्वीपणे कामकाज करता येते. आम्ही या व्यवसायांना एंटरप्राइझ नेटवर्किंग आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्सचा संपूर्ण संच पुरवितो. डिजिटली-सक्षम सेवांच्या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही क्लाउड इकॉनॉमीमधील अॅप्लिकेशन्सचे कार्यप्रदर्शन सुलभ, सुरक्षित करतो व ते वाढवितो.”

सेलेरिटीएक्स हा एक डिजिटली-सक्षम असा नेटवर्किंग सोल्यूशन ब्रँड आहे. ओआयएलने ३५०हून अधिक शहरांमध्ये निर्माण केलेल्या नेटवर्कचा लाभ या ब्रॅंडला होणार आहे. तसेच, ‘एचजीएस’च्या नेक्स्ट डिजिटल या डिजिटल मीडीया विभागाच्या भारतभरातील १० हजारांहून अधिक भागीदारांना व्यापक, अति-तत्पर आणि उत्कृष्ट व्यवस्थापन असलेले नेटवर्क हा ब्रॅंड पुरवील. व्यवहार्यता, सेवा वितरणाची दृश्यमानता, हमी आणि बिलिंग यांसाठी सेलेरिटीएक्स एक-समान इंटरफेस उपलब्ध करून देतो. त्यामुळे एंटरप्रायझेसना नेटवर्क वितरणाचे व्यवस्थापन करताना व्यावसायिक परिणामांवर आपले लक्ष केंद्रित करता येते.

Leave a Reply

%d bloggers like this: