Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

मिनीनेचर कलाकाराने तयार केली चंद्रयान 3 ची सोन्याची प्रतिकृती

चेन्नई  : चांद्रयान-3 हे उद्या ( 23 ऑगस्ट) चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सज्ज झाला आहे. यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. चंद्रयान 3 हे जेव्हा चंद्रावर उतरेल तेव्हा तो क्षण सर्वच भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा असणार आहे. आपला हाच आनंद प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत आहे. तामिळनाडू येथील एका मिनीनेचर कलाकाराने चंद्रयान3 ची सोन्याची प्रतिकृती तयार करून आपला देशाप्रति असलेला अभिमान व्यक्त केला आहे.   ( A gold replica of Chandrayaan 3 created by a mininature artist)

मरियप्पन असे त्यांचे नाव असून त्याने 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून चंद्रयान3 चे 1.5-इंच उंच मॉडेल तयार केले आहे. ही प्रतिकर्ती हुबेहूब चंद्रयान 3 सारखी असून पूर्णपाणे सोनेरी आवरण असलेली दिसत आहे. याविषयी बोलयांना मरियप्पन यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे की, “प्रत्येक वेळी जेव्हा एखादी महत्त्वाची घटना घडते तेव्हा मी सोन्याचा वापर करून एक लघु मॉडेल बनवतो. चंद्रयान 3 हे जेव्हा चंद्रावर उतरेल तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असणार आहे. चंद्रयान 3 मोहिमेत  सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार, मी 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून हे मॉडेल तयार केले आहे. हे डिझाइन करण्यासाठी मला 48 तास लागले.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading