Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजरात विधानभवनात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी आमदार राजू तोडसाम यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले.

उपाध्यक्ष  झिरवाळ यांनी सर्व मान्यवरांचे तसेच अधिकारी वर्गाचे पारंपरिक आदिवासी पध्दतीने तसेच क्रांतिवीरांच्या मूर्ती भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह महाराष्ट्र विधानमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading