Wednesday, May 6, 2026
Latest NewsSports

आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे दुसर्‍या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने दुसरा तर, गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या सामन्यात अर्णव पाटील याच्या ६१ धावांच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६७ धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १६६ धावांचे आव्हान उभे केले. अर्णव पाटील याने ६१ धावांची तर, प्रधुमन कोळी याने ५३ धावांची खेळी केली. या दोघांनी ९२ चेंडूत ९९ धावांची सलामी देताना भक्कम धावसंख्येचा पाया रचला. फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव या आव्हानासमोर ९९ धावांवर मर्यादित राहीला.

शिव चैनानी याच्या अष्टपैलू खेळीमुळे गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ऐ.के. स्पोर्ट्स संघाचा १०७ धावांनी सहज पराभव करून गुणांचे खाते उघडले. गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा धावफलकावर लावल्या. समवेद गायकवाड याने ५१ धावा, शिव चैनानी नाबाद ४२ धावा आणि पद्मेश अनेय ३८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या १७३ पर्यंत पोचवली. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऐ.के. स्पोर्ट्सचा डाव ६६ धावांवर गडगडला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १६६ धावा (अर्णव पाटील ६१ (५३, ११ चौकार), प्रधुमन कोळी ५३ (५९, ६ चौकार, १ षटकार), आयुष गोसावी २३, प्रथमेश पामू ३-२९);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी अर्णव आणि प्रधुमन ९९ (९२) वि.वि. फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३.५ षटकात १० गडी बाद ९९ धावा (सौरभ कांबळे ४५, इशान मिश्रा २-१४, अमित पुजारी २-१६); सामनावीरः अर्णव पाटील;

गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ४ गडी बाद १७३ धावा (समवेद गायकवाड ५१ (५५, ९ चौकार), शिव चैनानी नाबाद ४२ (४२, ५ चौकार, पद्मेश अनेय ३८) वि.वि. ऐ.के. स्पोर्ट्सः २०.२ षटकात १० गडी बाद ६६ धावा (राजीव देशमुख १९, मानस कुलकर्णी ३-१८, शिव चैनानी १-२१); सामनावीरः शिव चैनानी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading