अण्णा भाऊ साठे जयंती सुरळीत पार पाडल्याबद्दल अप्पर पोलीस आयुक्त प्रविण पाटील यांचा सत्कार
पुणे : १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती पूर्ण राज्यभर उत्सवात साजरी केली जाते .त्याप्रमाणेच पुणे शहरात ही साजरी केली जाते .पुण्यात सारसबाग येथे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात तसेच या ठिकाणी अभिवादन सभाही होतात .पुणे शहर जिल्हा मातंग समाज साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पुणे पुणे शहर पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे जयंती करिता सर्व पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त देऊन कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजीपूर्वक दखल घेतल्याबद्दल पुणे शहर जिल्हा मातंग समाज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील व उपायुक्त संदीप सिंह गिल यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला व पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले यावेळी स्वागत अध्यक्ष पंढरीनाथ आढळगे व सचिव दयानंद अडागळे ,नगरसेवक अविनाश बागवे, अँड राजश्री ताई अडसूळ, अँड महेश सकट, अनिल हातागळे ,रवी पाटोळे , राहुल खुडे, सुखदेव अडागळे ,महेश सकट,व इतर समाज बांधव व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .
