Wednesday, May 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

रंजक’ थरारक भूमिकेतून अभिनेता आदित्य कदम करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण

सिनेविश्वात काम करण्यासाठी कित्येक कलाकारांची धडपड सुरू असते, याबद्दल अनेकदा ऐकायला मिळालं आहे. गावातून शहरात येत सिनेसृष्टीशी जुळवून घेत ही कलाकार मंडळी आपला जम बसवू पाहतात. बरं, या त्यांच्या इथवरच्या प्रवासामागे अर्थात कलाकारांची मेहनत असते आणि याचं संपूर्ण श्रेय ही त्यांनाच जातं. अशाच एका होतकरू कलाकाराने सिनेमाक्षेत्रात स्वबळावर आपलं विश्व तयार करत हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

मूळचा कोल्हापूर येथील असलेला अभिनेता आदित्य कदम याने स्वकर्तृत्वावर लांबचा पल्ला गाठला आहे.निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांच्या ‘Bollywood Rising acting Academy’ Mumbai, येथे अभिनयाचे धडे घेत त्याने सिनेसृष्टीतील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांच्या ‘एएसपी फिल्म एंटरप्राईज प्रॉडक्शन’ने आदित्यला खूप मोठा ब्रेक दिला असं म्हणणं अचूक ठरेल. ‘एएसपी फिल्म एंटरप्राईज प्रॉडक्शन’च्या एका नव्या प्रोजेक्टमधून आदित्य प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ या नव्याकोऱ्या रंजक आणि थरारक हिंदी सिनेमातून तो मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होत आहे. एकांकिका, नाटकं करून आदित्यने रंगभूमीवर आपला चांगलाच ठसा उमटवला. त्यांनतर आता आदित्यने हिंदी चित्रपटातून स्वतःच नावं मोठं करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, “एकांकिका, नाटकं करत करत मी अभिनयाची आवड जोपासली. कालांतराने ही आवड शांत बसू देत नव्हती. तेव्हा मला निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांच्या ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ चित्रपटाची ऑफर चालून आली. निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांनी मला खूप मोठी संधी दिली आहे, त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन. मोठ्या पडद्यावर काम करणं, हे अर्थात प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं, असंच स्वप्न उराशी बाळगून मी आलोय, आणि ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी पाहता माझं स्वप्न पूर्ण झालं. पण इथेच न थांबता अजूनही प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे.

लवकरच ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. या हिंदी सिनेमामधून आदित्यला पाहणे नक्कीच रंजक ठरेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading