Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

धावत्या ट्रेनमध्ये फिल्मी स्टाईल गोळीबार; पहाटेच्या हत्याकांडाने देश हादरला  

मुंबई : धावत्या ट्रेनमध्ये एका आरपीएफ  (Railway police force) च्या जवानाकडूनच प्रवाश्यांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. आज (दि. ३१) पहाटे साडे पंचाच्या सुमारास जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (Jaipur – Mumbai superfast express  ) या रेल्वेत ही घटना घडली. एखाद्या चित्रपटातील थरारनाट्य शोभावे अशी ही सर्व घटना आहे. या गोळीबारात आरपीएफ अधिकाऱ्यासह चार प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रेल्वे प्रवाश्यांची सुरक्षा ज्यांच्या हातात असते, त्याच आरपिफ जवानांकडून रेल्वे प्रवाश्यांवर गोळीबार करण्यात आल्याने भल्या पहाटे घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. चेतन सिंग असे आरोपी असलेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या प्रार्थमिक माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास जयपूर – मुंबई (Jaipur – Mumbai superfast express  ) ही रेल्वे मुंबई सेंट्रल (Mumbai central) या रेल्वेस्थानाकाकडे येत होती. यावेळी पालघर ते मीरा रोड या दरम्यान आरोपी चेतन याची रेल्वे प्रवाशयांसोबत बाचाबाची झाली. यावेळी त्याने प्रवाश्यांवर गोळीबार करण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्या सहकार्याने चेतनला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतनने कोणाचेही ऐकले नाही. या प्रकारात चेतन ने आपल्या अधिकाऱ्यासह तीन प्रवाश्यांवर गोळीबार केला. धावत्या रेल्वे मध्ये पॅट्री कार,   S 6 , B 5 या तीन डब्यात हा गोळीबार झाला.  हे चौघेही जागीच ठार झाले. दरम्यान, चेतन हा प्रकार घडल्यानंतर बोरिवली स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी महाराष्ट्र पोलिस व इतर प्रवाश्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात यश आले आहे. या प्रकारामुळे ही रेल्वेगाडी मुंबई सेंट्रल येथे जवळपास पाऊण तास उशिरा पोहचली.

दरम्यान, सादर प्रकरणी आरोपी चेतन सिंग आरपिफ (Railway police force)च्या जवानाकडे पोलिस चौकशी करत असून प्रवाश्यांचे मृतदेह शताब्दी रुग्णालय कांदिवली येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading