राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत
नागपूर येथील विविध कार्यक्रम आटोपून राष्ट्रपती मुर्मू यांचे दुपारी येथे आगमन झाले. मुंबई येथील दौऱ्यात राष्ट्रपती महोदया सिद्धीविनायक मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेणार आहेत, त्यानंतर राजभवन येथे त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहणार आहेत.
