Saturday, June 13, 2026

Day: February 5, 2023

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वर्धेच्या ज्ञान यज्ञातील विचाराचे अमृत समाजाला नवी दिशा देण्याचे काम करेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप वर्धा – वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या ज्ञान यज्ञातून विचाराचे अमृत

Read More
Latest NewsMAHARASHTRA

नवतंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वर्धा  : विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती जागरुक करुन नवतंत्रज्ञान व संशोधनाचा वापर करत नवनवे प्रयोग करावे. समाजासाठी हितकारक होईल, असे कार्य विद्यार्थ्यांनी

Read More
Latest NewsMAHARASHTRA

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी वंचित समाजाचा सहभाग महत्त्वाचा –साहित्य संमेलन परिसंवादातील वक्त्यांचा सूर

वर्धा, :लोकशाही ही समाजातील विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने समृद्ध होत असते. परंतु अजूनही वंचित समाजातील काही घटकांचा सहभाग पूर्णपणे झाला असल्याचे दिसत नाही. यासाठी या घटकातील व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवून त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आचार्य विनोबा भावे सभामंडपात ‘वंचिताचे साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर आयोजित परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीन प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात संवादक म्हणुन डॉ. दीपक पवार यांच्यासह बाळकृष्ण रेणके, दिशा पिंकी शेख, हर्षद जाधव, रझिया सुलताना, मुफीद मुजावर वक्ते म्हणून सहभागी झाले होते. व्यासपीठावर अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. सुरुवातीस डॉ.देशपांडे यांनी मतदार होणे लोकशाहीची पहिली पायरी असल्याचे सांगितले. बेघर, भटके विमुक्त, देहव्यवसायातील महिला, पारलिंगी या वंचित समाजातील घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लोकशाहीची संकल्पना अधिक मजबूत आणि दृढ करण्यासाठी साहित्य संमेलन हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. वंचित समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोग गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पारलिंगी कवयित्री असलेल्या दिशा पिंकी शेख यांनी सांगितले की, परंपरेने पारलिंगी समाजाची विशिष्ट प्रतिमा निर्माण केली आहे. ती प्रतिमा बदनामी करणारी आहे. अजूनही पारलिंगी व्यक्तीशेजारी कुणी बसायला तयार होत नाही. ही भावना अतिशय क्रूर आहे. 2014 पर्यंत साधे नागरिकत्वही आम्हाला मिळाले नव्हते. मी माझ्या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. मलाही काहीतरी व्हावं वाटतं, त्यासाठीच लिहायला लागले. लेखणी आधुनिक काळातील मोठ शस्त्र आहे. हे शस्त्र समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकते. पारलिंगी साहित्याची चांगली चळवळ भविष्यात उभी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठी मुसलमान साहित्यातील अभ्यासक असलेल्या मुफिद मुजावर म्हणाले, राज्यातील मुसलमानांमध्ये सुफी आणि भक्ती परंपरेचा समावेश दिसतो. वारकरी, नाथ, दत्त परंपरेचा प्रभाव देखील दिसतो. पारंपरिक साहित्यात मुसलमानांची एकसाची प्रतिमा निर्माण झाली आहे. सय्यद अमिन यांनी अनेक चरित्र लेखन केले. शिवाजी महाराजांच्या चरित्रात त्यांनी महान उदारमतवादी शिवाजी राजनेता अशी मांडणी केली आहे. मुस्लीम साहित्यिकात अलिकडे सामुहीक स्वरुप आले आहे, असे मुजावर यांनी सांगितले. हर्षद जाधव म्हणाले, पूर्वी अपंगांना गुप्त मतदान करता येत नव्हते. सहाय्यकाच्या मदतीने मतदान करावे लागत होते. सहाय्यकाला मात्र कुणाला मतदान केले ते कळत असत. ईलेक्ट्रॅानिक व्होटींग मशीन मधील सुविधेमुळे आम्हाला गुप्त मतदानाचा अनुभव घेता येत आहे. अपंगांचे जीवन, जाणिवा, त्यांचा संघर्ष काही साहित्यिकांनी मांडला आहे. परंतु अजुन आणि अधिक स्पष्टपणे हा संघर्ष मांडण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक अपंग व्यक्ती आपल्या कार्यातून अपंगत्व भरुन काढण्याचा प्रयत्न करत असते. अपंगांच्या समाजात चांगल्या प्रतिमा निर्माण केल्या जाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आपल्या संबोधनात रझिया सुलताना म्हणाल्या की, समाजाचे सगळे प्रश्न कायद्याने सुटत नाही. यासाठी संवेदनशीलता देखील असावी लागते. मुसलमान तरुणांमध्ये अलीकडे चिंतनशिल आणि प्रश्न विचारणारी पिढी निर्माण झाली आहे. वाईट प्रथा, परंपरा बदलवायला सांगणारी ही पिढी आहे. प्रथम भारतीय नंतर मुसलमान ही भावना 1970 मध्ये हमीद दलवाई यांनी रुजविली. पुढे अनेकांनी ही प्रथा पुढे चालविली. मुसलमान महिलांना वेगवेगळ्या प्रवाहाला बळी पडावे लागत आहे. परंतु सामाजिक अभिसरण देखील चांगल्या पध्दतीने होत असल्याचा आनंद आहे. सर्व अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम साहित्य करत आहे. अधिक संवेदनशील लिखानाने लोकशाही उच्च पातळीवर जात आहे. भटक्या विमुक्त समाजासाठी दीर्घ काळापासून काम करीत असलेले बाळकृष्ण रेणके म्हणाले, चौकटी, चाकोरी बाहेर जावून वंचित घटकात आवश्यक लोकशाही रुजविण्यासाठी प्रचार प्रसाराचे काम निवडणुक आयोग करीत आहे. वंचित घटकात लोकशाही रुजवून देश बलवान करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. साहित्य म्हणजे समाजाचे वास्तव दाखविणारा आरसा आहे. ब्रिटीश काळात भटक्यांना बदनाम करणारे नकारार्थी साहित्य तयार केले गेले. दलित लेखकांची आत्मकथने त्यांच्या अस्मितेची तर भटक्या समाजातील व्यक्तींची आत्मकथने हा त्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे. आत्मकथने त्या त्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असते. वंचित समाजाच्या समस्या कशा सुटतील याचा संवेदनशिलपणे विचार केल्यास लोकशाही समृध्द होईल. भटक्या हा विकास प्रक्रियेतला अदृष्य समाज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना विकासाची गोड फळे चाखण्याची संधी मिळावी, असे बाळकृष्ण रेणके यांनी पुढे सांगितले. परिसंवादाचे संवादक डॉ.दीपक पवार यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. श्रोते, वक्ते व आयोजकांमध्ये संवादकांची उत्कृष्ट भूमिका त्यांनी पार पाडली. यावेळी श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शेवटी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी आभार मानले. परिसंवादाला साहित्य रसिक, शिक्षक, विद्यार्थी, वंचित समाजातील अभ्यासक, वक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More
Latest NewsPUNE

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात उत्साहात स्वागत

पुणे : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चा जयघोष… रांगोळीच्या पायघड्या… फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ठेवलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी

Read More
Latest NewsPUNE

नेत्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेतले तरच पक्ष बळकट होतो – आमदार श्रीकांत भारतीय

पुणे : कोणत्याही नेत्याने कार्यकर्त्यांना सोबत घेतले तर पक्ष संघटना अधिक बळकट होते याचे हे जिवंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी

Read More
BusinessLatest News

जलदगतीने सेवा पुरविणे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध : आशिष पांडे

पुणे पूर्वच्या वतीने ‘ग्राहक संपर्क अभियान’ : सुमारे ७८ कोटी रुपयांचे कर्ज मंजुरी प्रस्तवांचे वाटप पुणे : भारतातील प्रत्येक जिल्ह्यात बँकेची

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मलंगगडावर आरती

ठाणे : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याणजवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री मलंगगडावर जाऊन समाधीचे दर्शन

Read More
Latest NewsMAHARASHTRASports

Khelo India : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेला चार सुवर्ण १ रौप्य

भोपाळ  : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली.

Read More
Latest NewsSports

एसीएच स्मॅशर्स संघाला विजेतेपद !!

दहावी सुहाना कुंदन सीए क्रिकेट लीग स्पर्धा पुणे : आयसीएआयच्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित दहाव्या ‘सुहाना कुंदन करंडक’

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

धक धक गर्ल माधुरी दीक्षितची PIFF ला भेट

सिनेमातील मोकळ्या जागेचा कलात्मक वापर हे खरे कौशल्य – शाजी करुन पुणे  : “एखादा सिनेमा बनवताना त्यातील मोकळ्या जागा अर्थात

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन

दुबई : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडिया नुसार मुशर्रफ दीर्घकाळपासून आजारी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

देशात पाण्यासाठी राज्या – राज्यात युद्धपरिस्थिती का निर्माण केली जाते? – के. चंद्रशेखर राव

नांदेड : देशात मुबलक प्रमाणात पाणी आहे. सरकार दमदार असेल तर प्रत्येक एकरमध्ये पाणी देऊ शकते. पण देशात पाणी असूनही

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पोटनिवडणूक बिनविरोध करावी राज ठाकरेंचे आवाहन

मुंबई : आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होत आहेत.

Read More
Latest NewsMAHARASHTRASports

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची पत्नीला मारहाण

मुंबई :  भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने आपल्याला मारहाण केली, असा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. या

Read More
Latest NewsMAHARASHTRA

साहित्य संमेलनात’ ‘स्टोरीटेल’च्या ऑडिओबुक्सला साहित्यप्रेमींची दिलखुलास दाद!

साहित्य नगरीत ‘स्टोरीटेल’ची पाच हजाराहून अधिक ऑडिओबुक्सचा खास साहित्य-रसिकांसाठी!! स्टोरीटेलने मराठीतील पाच हजारांहून अधिक सर्वोत्तम पुस्तके ऑडिओ स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी ;खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी

Read More
Latest NewsPUNE

सुरांच्या साथीने सैनिकांच्या वीर मरणाचे कृतज्ञ स्मरण !

पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिना निमित्त सुरांच्या साथीने शहीद जवानांच्या वीरमरणाचे कृतज्ञ स्मरण करीत आदरांजली अर्पण करण्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRA

महाराष्ट्र एस. टी.वर्कर्स (इंटक) संघटनेच्या नवीन राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न

मुंबई : महाराष्ट्र एस. टी.वर्कर्स (इंटक) संघटनेच्या नवीन राज्य कार्यकारणीचे सदस्य तसेच विविध निमंत्रित मान्यवर राज्यस्तरीय पदाधिकारी, विभागीय सचिव, महिला

Read More
Latest NewsMAHARASHTRA

धुळे शहर ‘सीसीटीव्ही’ च्या निगराणीखाली

धुळे : धुळे शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण तसेच शहरातील संवदेनशील भागावर

Read More
Latest NewsPUNE

कर्करोगमुक्त नागरिकांचा अभिनव पद्धतीने जागतिक कर्करोग दिन साजरा

प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचा उपक्रम पुणे  – कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन जगभरात

Read More