Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात उत्साहात स्वागत

पुणे : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चा जयघोष… रांगोळीच्या पायघड्या… फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ठेवलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सुरु असलेली लगबग आणि ठिकठिकाणी झालले स्वागत अशा भक्तीने भारलेल्या वातावरणात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थांच्यापालखीचे स्वागत पुणेकरांनी उत्साहात केले. मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून वाजत-गाजत निघालेला पालखी सोहळा कॉंग्रेस भवन येथे विसावला.

व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे आणि पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी पुणे मराठी बांधकाम संघटनेचे नंदू घाटे, सचिव मिलिंद देशपांडे, संदीप चव्हाण, श्रीपाद थोरात, अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण उपस्थित होते.
मंडई चौकी – चितळे बंधू मिठाईवाले – नूमवि प्रशाला – अहिल्यादेवी शाळा- रमणबाग शाळा ते शिंदेपार आणि कॉंग्रेस भवन असा पालखीचा मार्ग होता. पालखी सोहळ्याचे यंदा २६  वे वर्ष आहे. मिरवणुकीची सुरुवात मंडईतील शारदा-गजानन मंदिरापासून झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारा आणि त्यामागे अश्वराज, राजकुमार, प्रभात, न्यू गंधर्व, स्वरांजली आदी बँडपथके सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या रथातील आकर्षक आरास केलेल्या पालखीचे पुष्पवृष्टी आणि रांगोळ््या घालून पुणेकरांनी ठिकठिकाणी स्वागत केले.

पालखी सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष आहे.  दरवर्षी प्रदान करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा स्वामी भक्त बंडोपंत तिखे यांना देण्यात येणार आहे. मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

सोमवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार असून दिवसभर रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश विनामूल्य आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading